उत्सवमूर्ती आणि कलशाचे दर्शन पेटी चौकात
संवर्धन प्रक्रियेमुळे अंबाबाईची मुख्य मूर्ती दर्शनासाठी उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे या दोन दिवसांत उत्सवमूर्ती आणि कलश मुख्य गर्भगृहाबाहेर पेटी चौकात ठेवण्यात येणार आहे, जेणेकरून भाविकांना दर्शन घेता येईल.
संवर्धन प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी सकाळी दहा वाजेपर्यंत सर्व धार्मिक विधी पूर्ण करण्यात येणार आहेत. श्रीपूजक माधव मुनिश्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 8:30 वाजता मूर्तीवर अभिषेक आणि आरती होईल. त्यानंतर धार्मिक विधींद्वारे देवीचा कलश आणि उत्सवमूर्ती गर्भगृहाबाहेर नेण्यात येईल. बुधवार, 13 ऑगस्ट रोजी पुन्हा देवीतत्त्व कलशाचे धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर सकाळी 10 वाजल्यापासून भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे.
advertisement
मूर्ती संवर्धनाचे स्वरूप
या संवर्धन प्रक्रियेमध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे तज्ज्ञ खालीलप्रमाणे काम करतील
- मूर्तीची सध्याची स्थिती तपासली जाईल.
- 2015 साली झालेल्या संवर्धन प्रक्रियेचा आढावा घेतला जाईल.
- मूर्तीवर झालेली नैसर्गिक झीज, धूळ आणि हवामानामुळे झालेले परिणाम तपासले जातील.
- मूर्तीच्या दीर्घकाळासाठी जतनासाठी आवश्यक रासायनिक उपाययोजना केल्या जातील.
हे ही वाचा : कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 'मिशन मोड'वर काम! 60 हजार खटले वर्ग होणार, 700 वकिलांना मिळणार संधी!
हे ही वाचा : विजयदुर्ग किल्ल्याचा 'हा' बुरूज ढासळला; समुद्री लाटांच्या माऱ्यामुळे होतीय पडझड! कोण देणार लक्ष?