स्वराज्याच्या लढ्याचा साक्षीदार, कोकणातील 'या' जलदुर्गाचा बुरुज ढासळला, इतिहासप्रेमींची चिंता वाढली!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारसांपैकी एक असलेल्या विजयदुर्ग किल्ल्याची पावसाळ्यात पडझड सुरूच आहे. समुद्रातील जोरदार लाटांमुळे दिशादर्शक...
देवगड (सिंधुदुर्ग) : महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशापैकी एक असलेल्या विजयदुर्ग किल्ल्याची पावसाळ्यात पडझड सुरूच आहे. समुद्रातील जोरदार लाटांच्या माऱ्यामुळे दिशादर्शक बत्तीजवळ असलेल्या व्यंकट बुरुजाची समुद्राकडील खालची बाजू ढासळली आहे.
नैसर्गिक संरक्षणाचा अभाव
विजयदुर्ग किल्ल्याची बांधणी करताना नैसर्गिक रचनेचा विचार करण्यात आला होता. किल्ल्याची तटबंदी थेट लाटांच्या माऱ्याने कमकुवत होऊ नये, यासाठी समुद्रातील खडकांची मांडणी अशा पद्धतीने करण्यात आली होती, जेणेकरून लाटांची ऊर्जा कमी होऊन ती समुद्रातच परत फिरेल. हा किल्ला खडकावर टप्प्याटप्प्याने बांधलेला असल्याने त्याला तीन बाजूने खोल पायाचे आणि नैसर्गिक खडकांचे संरक्षण मिळते. मात्र, कालांतराने निसर्गातील बदलांमुळे ही नैसर्गिक रचना कमकुवत होत गेली आणि किल्ल्यावर लाटांचा मारा वाढला.
advertisement
‘ट्रायपॉड’ची गरज
समुद्राच्या या माऱ्याला थांबवण्यासाठी ‘ट्रायपॉड’सारखे काँक्रिटचे उपाययोजन करणे आवश्यक होते. पण तसे प्रयत्न झाले नाहीत. दरम्यान, आता युनेस्कोच्या (UNESCO) ताब्यात हा किल्ला गेल्यामुळे किल्ल्याचा कायापालट होऊन तटबंदी भक्कमपणे उभी राहणार, असा विश्वास किल्लाप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
हे ही वाचा : कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 'मिशन मोड'वर काम! 60 हजार खटले वर्ग होणार, 700 वकिलांना मिळणार संधी!
advertisement
हे ही वाचा : सांगलीतील 25000 शेतकरी 'पीएम किसान योजने'च्या पैशांपासून वंचित, शासनाची 'ही' अट केली नव्हती पूर्ण!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 11, 2025 8:10 AM IST
मराठी बातम्या/कोकण/
स्वराज्याच्या लढ्याचा साक्षीदार, कोकणातील 'या' जलदुर्गाचा बुरुज ढासळला, इतिहासप्रेमींची चिंता वाढली!