TRENDING:

...तेव्हा हिटलर वापरत होता तशी मेबॅक कार कोल्हापुरात कशी आली? रंजक असा इतिहास Video

Last Updated:

गेली कित्येक वर्ष ही कार कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याची शान बनली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर, 25 ऑक्टोबर : कर्नाटकातील मैसूरच्या धरतीवर लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात शाही दसरा सोहळा साजरा करायला सुरुवात केली. सध्या भारतामध्ये दोन नंबरचा महत्त्वाचा असा हा सोहळा असतो. तर याच सोहळ्याच्या निमित्ताने कोल्हापूरकरांना पाहता येते भारतात सध्या एकमेव असलेली कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याची शाही मेबॅक कार.. गेली कित्येक वर्ष ही कार कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याची शान बनली आहे.
advertisement

कोल्हापुरातील छत्रपतींच्या मालकीची असणारी ही मेबॅक कार लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. कोल्हापुरात शारदीय नवरात्रौत्सवानंतर विजयादशमीला साजरा होणाऱ्या सीमोल्लंघनासाठी छत्रपती घराण्यातील सदस्यांचे या मेबॅक कारमधूनच ऐतिहासिक दसरा चौकात आगमन होत असते. या एकाच दिवशी कोल्हापूरकरांना ही कार पाहायला मिळत असते.

अस्सल सागवानी लाकडापासून बनलेलं देवघर अवघ्या 1 हजारांपासून करा खरेदी? एकदा हा VIDEO पाहाच

advertisement

असा आहे या कारचा इतिहास

मेबॅक कार ही जर्मन मेड गाडी आहे. तर छत्रपतींच्या मालकीची ही मेबॅक ऑर्डर देऊन बनवून घेण्यात आलेली होती. खरंतर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कंपनीकडून या कारचे उत्पादन ठप्प झाल्यामुळे जगभरात अगदी मोजक्याच कार सध्या शिल्लक राहिल्या आहेत. त्यातीलच एक असणारी ही कोल्हापुरातील शाही मेबॅक कार आहे. तर जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलर देखील अशीच मेबॅक कार वापरत होता. त्यामुळे या गाडीला 'हिटलरर्स रोल्स' असेही म्हंटले जात असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले आहे.

advertisement

पुणेकरांनो दिवाळीची करायची खरेदी, इथं एकाच छताखाली आहेत 50 हजारांपेक्षा जास्त प्रॉडक्स, VIDEO

शाहू महाराजांच्या काळात दसरा सोहळ्यासाठी हुजुर स्वारी ही हत्ती, घोडे, उंट अशा सर्व शाही लवाजम्यासह रथातूनच यायची. मात्र छत्रपती राजाराम महाराज यांनी ही मेबॅक कार साधारण 1936 च्या सुमारास बनवून घेतली होती. त्यांच्या काळापासूनच या कारनेच रथाची जागा घेतली आहे. त्यामुळे दरवर्षी पार पडणाऱ्या कोल्हापुरच्या शाही दसरा सोहळ्यात ही मेबॅक कार आजही प्रमुख आकर्षण असते.

advertisement

अशी आहे ऐतिहासिक मेबॅक कार...

छत्रपती राजाराम महाराज यांनी ही कार ऑर्डर देऊन बनवून घेतली होती. त्यामुळे या गाडीला कोल्हापूर अर्थात करवीर संस्थानच्या ध्वजाचा केशरी रंग देण्यात आला आहे. गाडी बनवताना चढवलेला रंगच आजही गाडीवर आहे. गाडीवर पुढच्या बाजूला करवीर संस्थानचे मानचिन्ह देखील दिसते. त्याच्या बाजूने 'छत्रपती महाराज ऑफ कोल्हापूर' असेही लिहिण्यात आले आहे. तर त्याच्याच वरच्या बाजूला शिवछत्रपतींना तलवार देणारी भवानीमाता कोरण्यात आली आहे. गाडीच्या बॉनेटवर भगवा ध्वजही लावण्यात आला आहे.

advertisement

खरंतर कोल्हापूरच्या नवीन राजवाड्यात ध्वजाबाबत एक परंपरा जपली जाते. जेव्हा श्रीमंत शाहू महाराज छ्त्रपती हे वाड्यात उपस्थित असतात. तेव्हाच वाड्यावर भगवा ध्वज फडकत असतो. अगदी तशीच परंपरा या गाडीसाठी वापरली जाते. जेव्हा श्रीमंत शाहू महाराज छ्त्रपती हे गाडीत असतात, तेव्हाच समोरचा भगवा ध्वज उघडला जातो.

दिवाळी-धनत्रयोदशी आधी बसला फटका, बाजारातून हे नाणी आणि नोटा झाल्या गायब, पण कारण काय?

गाडी 17 फूट लांब आणि 6 फूट रुंद असून गाडीत 6 ते 7 जण आरामात बसू शकतात. तर ही गाडी पूर्णतः ऑटोमॅटिक असून गाडीचे स्पीडमीटर हे किलोमीटर ऐवजी मैल परिमाण दाखवते. गाडीला मेकॅनिकल ब्रेक्स असून त्याला वॅक्कुम असिस्टंस आहे. गाडीचे छत हे हवे तसे उघडता किंवा बंद करता येत असून गाडीला टिंटेड फॉल्डेबल काचा आहेत. 200 लिटर क्षमतेचा पेट्रोल टँक असणारी ही गाडी 1 लीटर पेट्रोलमध्ये फक्त 1 किलोमीटर धावते.

दरम्यान अगदी छोट्या छोट्या बाबतीत देखील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असणारी ही गाडी अतिशय रॉयल वाटते. तर दरवेळी शाही दसरा सोहळ्यात सर्वांसमोर छत्रपतींना घेऊन तिची शाही एन्ट्री होत असते. त्यामुळे कोल्हापूरकर नेहमीच या गाडीला पाहण्यासाठी उत्सुक असतात.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
...तेव्हा हिटलर वापरत होता तशी मेबॅक कार कोल्हापुरात कशी आली? रंजक असा इतिहास Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल