पुणेकरांनो दिवाळीची करायची खरेदी, इथं एकाच छताखाली आहेत 50 हजारांपेक्षा जास्त प्रॉडक्स, VIDEO
- Published by:News18 Marathi
Last Updated:
इथे दिवाळीसाठी तुम्हाला खरेदी करता येतील.
पुणे, 25 ऑक्टोबर : दिवाळीसाठी तुम्ही खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खरेदीची चांगली संधी आहे. पुण्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठा माय टेक्स्टचा व्यापार मेळा भरला आहे. जो विविध उद्योगातील सहभागी लोकांना एकाच ठिकाणी आणतो. ग्राहकोपयोगी वस्तूंपासून ते हस्तशिल्पांपर्यंतच्या वस्तू व्यापाराला चालना देतो. पुण्यातील ऍग्रीकल्चर कॉलेज मैदान येथे हा मेळावा भरवण्यात आला आहे. यामध्ये 5 देशासह 18 राज्यांचा देखील समावेश आहे. फुर्निचर, लाईफ स्टाईल प्रॉडक्स आणि फूड प्रॉडक्स इथे दिवाळीसाठी तुम्हाला खरेदी करता येतील.
कुठले प्रॉडक्स आहेत?
फॅशन लाईफ स्टाईल, फुर्निचर होम डेकोर, हॅन्डलूम हँडी क्राफ्ट, किचन अप्लायन्सेस, हेल्थ आणि ब्युटी, गिफ्ट आर्टिकल आणि ज्वेलरी अशा विविध 50 हजार पेक्षा जास्त प्रॉडक्स आणि 500 स्टॉल हे या ठिकाणी पाहिला मिळतात. या प्रॉडक्सची तुम्ही 10 रुपयांपासून 50 हजार रुपयापर्यंत खरेदी करू शकतात. या प्रॉडक्सवर मेगा दिवाळी डिस्काउंट देखील दिला जात आहे. हा मेळावा 29 ऑक्टोबर पर्यंत सुरु असणार आहे.
advertisement
कुठल्या देशांचा समावेश
बांगलादेश, अफगाणिस्तान, इराण, मलेशिया, थायलंड या 5 देशाचा समावेश यामध्ये आहे. तर गुजरात, केरळ, मध्य प्रदेश,महाराष्ट्र, राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगाना, उत्तर प्रदेश, गोवा, झारखंड अश्या 18 राज्यांचा यामध्ये समावेश आहे.
advertisement
अस्सल सागवानी लाकडापासून बनलेलं देवघर अवघ्या 1 हजारांपासून करा खरेदी? एकदा हा VIDEO पाहाच
मार्केटमध्ये जे प्रॉडक्स आहेत ते ही या मेळाव्यात पाहिला मिळतात आणि असे पण काही प्रॉडक्स आहेत जे बाहेरून घेऊन आलेलो आहोत. यामध्ये इलेक्ट्रॉनिकच्या पण कंपनी आहेत. हा मेळावा पुण्यात खूप वर्षानंतर होत आहे, अशी माहिती मेळाव्याचे आयोजक हितेन प्रजापती यांनी दिली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 25, 2023 3:25 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
पुणेकरांनो दिवाळीची करायची खरेदी, इथं एकाच छताखाली आहेत 50 हजारांपेक्षा जास्त प्रॉडक्स, VIDEO