ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक
झालेल्या अपघातानुसार, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील भाडळे खिंडीच्या हद्दीत ऊस वाहतूक करणारा एक ट्रक मागून येणाऱ्या मोटरसायकलला धडकला. अपघातात ठार झालेले तरुण पारस आनंदा परीट (वय 21) आणि सुरेश ज्ञानदेव उंड्रीकर (वय 21, दोघे रा. अंबर्डे, ता. शाहूवाडी) हे सैन्य भरतीसाठी कोल्हापूरला गेले होते. भरतीची प्रक्रिया पूर्ण करून ते आपल्या गावी अंबर्डे येथे परत येत असतानाच भाडळी खिंडीजवळ त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक बसली.
advertisement
मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात
ट्रकच्या या धडकेत दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच शाहूवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक परशुराम शिरसाठ, पोलीस हेडकॉन्स्टेबल कोगेकर, चालक माळी आणि महामार्ग पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब पालखी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. शवचिकित्सा पूर्ण झाल्यानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.ॉ
सखोल चौकशीची मागणी
दरम्यान, दोन्ही तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या गावकऱ्यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची आणि निष्काळजी ट्रकचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.
