सीसीटीव्हीमध्ये कैद झाली घटना
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश आगमन मिरवणुकीत वाजीद जमादार याने त्याच्या ओळखीच्या मित्रांना सोबत नाचण्याचा आग्रह केला होता. याच गोष्टीवरून त्यांच्यात वाद झाला आणि या वादाचे पर्यवसान चाकू हल्ल्यात झाले. हल्ला करणारा आरोपी अज्ञात असून, त्याने जमादारवर चाकूने वार केले. हल्ल्याची ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
advertisement
या घटनेनंतर जखमी वाजीद जमादार याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याआधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलीस तपास सुरू
या घटनेमुळे मिरवणुकीत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. राजारामपुरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आणि लवकरच आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सण-उत्सवाच्या काळात अशा घटनांमुळे शांतता आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.