गेल्या आठवड्याभरापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे 95 बंधारे अद्यापही पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था ही विस्कळी झाली आहे. पश्चिम घाट माथ्यावर पावसाची संततधार कायम आहे. तर राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी असून धरणाच्या दोन स्वयंचलित दरवाज्यातून ४३५६ क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
advertisement
दरम्यान दुसरीकडे कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. रात्री साडेदहा वाजता अलमट्टीतून तीन लाख 25 हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीत निर्माण झालेली पूरस्थिती नीवळण्यास मदत होणार आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.