परिवर्तन आघाडी
राजू शेट्टी म्हणाले, की परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आम्ही राज्यभर उमेदवार देणार आहोत. स्वाभिमानी शेतकरी संघटना शरद जोशी यांची शेतकरी संघटना डी आर एस यांच्यासह छोट्या मोठ्या संघटना यांची मिळून परिवर्तन आघाडी निर्माण झाली आहे. उद्या प्रकाश आंबेडकर यांची पुण्यामध्ये याच मुद्द्यावरून भेट घेणार आहोत. बैठकीमध्ये शिरोळच्या जागेसाठी आम्ही आग्रही राहू. आम्हालाही जागा आल्यानंतर उमेदवारावर चर्चा केली जाईल. मला लोकसभेमध्ये जाऊन एमएसपी कायदा लागू करून घ्यायचा आहे. आता माझी चळवळ केवळ त्यासाठी चालू आहे. देशभर शेतकऱ्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहे. कपिल पाटील यांच्यासह शहरातील छोट्या-मोठ्या संघटना देखील परिवर्तन आघाडीमध्ये सहभागी झाल्या आहेत. प्रत्येक मतदारसंघांमध्ये स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार शोधून त्यांच्या पाठीशी परिवर्तन आघाडीची ताकद देऊ, असं विधान राजू शेट्टी यांनी यावेळी केलं.
advertisement
वाचा - 'विधानसभेत 60 टक्के ओबीसी समाज हिसका दाखवेल' लक्ष्मण हाकेंचा शिंदेंना इशारा
कंगना रनौतवर टीका
खासदार कंगना रनौत यांचे शेतकऱ्यांबद्दलचं वक्तव्य उथळपणाचं आणि बेजबाबदारपणाच आहे. कंगना रनौत यांच्या वक्तव्यावर भाजपने कारवाई केली पाहिजे. कंगना रनौत यांच्या वक्तव्याशी संबंध नाही असं म्हटलं असलं तरी त्या भाजपच्या खासदार आहेत. पुन्हा त्यांनी शेतकऱ्यांचा अपमान होईल असे वक्तव्य करू नये अशी ताकीद भाजपने दिली पाहिजे. अन्यथा देशातील शेतकरी भाजपच्या विरोधात जाईल हे लक्षात ठेवावं, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.