TRENDING:

SSC Result: पहिलीत असतानाच नराधमाने आई हिसकावली, अश्विनी बिद्रेंच्या लेकीचं दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

Last Updated:

SSC Result: दिवंगत API अश्विनी बिद्रेच्या लेकीनं दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. तिला एमबीबीएस करून प्रसासकीय सेवेत अधिकारी व्हायचं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर: नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत दिवंगत सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या मुलीनं नेत्रदीपक यश मिळवलंय. सिद्धी उर्फ सूची राजू गोरे हिला 97.20 टक्के गुण मिळाले असून तिनं आईचं स्वप्न साकार केलंय. सूची ही कोल्हापूरच्या संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, अतिग्रे शाळेची विद्यार्थिनी आहे.
SSC Result: अश्विनी बिद्रे यांच्या लेकीनं नाव काढलं, दहावी परीक्षेत मिळाले इतके टक्के
SSC Result: अश्विनी बिद्रे यांच्या लेकीनं नाव काढलं, दहावी परीक्षेत मिळाले इतके टक्के
advertisement

प्रशासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न

सूची ही पहिलीत असतानाच आई अश्विनी बिद्रे यांची हत्या झाली होती. एवढ्या लहान वयात तिचं मातृछत्र हरपलं. पण सूचीने मोठ्या संघर्षमय काळात प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्दीने यश मिळवलं. यासाठी तिला वडील राजू गोरे यांनी नेहमीच प्रोत्साहन मिळालं. पुढे एमबीबीएसचं शिक्षण घेऊन नागरी सेवा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी होण्याचा तिचा मानस आहे.

advertisement

सगळ्याच विषयांमध्ये 35 टक्के मार्क कसे पडले? अभ्यास कसा केला? सोलापूरच्या पोराने सगळं सांगितलं...

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली होती. अश्विनी या मुळच्या हातकणंगले तालुक्यातील आळते येथील रहिवासी होत्या. 2005 मध्ये त्यांचं गावातील आनंद गोरे यांच्याशी लग्न झालं होतं. पुढे वर्षभरातच त्या स्पर्धा परीक्षा पास झाल्या होत्या. 2006 मध्ये पोलीस सेवेत भरती झालेल्या अश्विनी यांचं सुरुवातीला पुण्यात आणि नंतर सांगलीत पोस्टिंग होतं.

advertisement

11 एप्रिल 2016 रोजी त्या अचानक बेपत्ता झाल्या. त्यानंतर दीड वर्षांनी त्यांचा खून झाल्याचं तपासात समोर आलं. तर मृतदेहाचा पत्ता कळण्यासाठी अडीच वर्षांचा काळ गेला. पोलिसांनीच केलेला गुन्हा उलगडण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं. शेवटी मुख्य आरोपी अभय कुरुंदकर आणि त्याच्या दोन साथीदारांना न्यायालयानं दोषी ठरवलं.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
SSC Result: पहिलीत असतानाच नराधमाने आई हिसकावली, अश्विनी बिद्रेंच्या लेकीचं दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल