सतेज पाटील म्हणाले, "कोल्हापूरची बदनामी झाली"
कोल्हापुरीवर मिसळ ताव मारत ते कोल्हापुरच्या राजकारणावर चर्चा करत होते. दरम्यान, त्यांनी 'कोल्हापुरी मिसळ' यावरही भाष्य केले. ते म्हणाले की, "तिखट... तिखट... म्हणून कोल्हापुरची बदनामी झाली आहे." यावेळी सतेज पाटील यांनी कोल्हापुरातील त्यांच्या आवडीच्या 'मिसळ'चा पत्ताही सांगितला. ते म्हणाले की, "तंदूर, आहार, फडतरे मिसळ आणि बावड्यातील चव्हाण मिसळ मला खूप आवडतात."
advertisement
आम्ही गाफील राहिलो, त्यामुळे आमचा पराभव झाला
त्यानंतर विधानसभेच्या निकालावर भाष्य करताना सतेज पाटील म्हणाले की, "लोकसभेच्या निकालात आम्हाला प्रचंड यश मिळालं. आमचे नेते राहुल गांधींनी एक नरेटिव्ह देशामध्ये सेट केलेलं होतं. भाजप राज्यघटनेवर कसे अतिक्रमण करतंय, त्यासंदर्भात त्यांनी जनतेला सांगितलं होतं. भारत जोडोच्या माध्यमातून वातावरणही निर्माण झालं होतं. पण विधानसभेच्या निवडणुकीवेळी सीट वाटपामध्ये आम्ही (महाविकास आघाडी) फार वेळ घालवला. हा निर्णय लवकर झाला असता, तर प्रचाराला आम्हाला वेळ मिळाला असता. त्याचबरोबर आमचे 12 हजार बूथ प्लसमध्ये होते, त्यावर भाजपने लक्ष केंद्रीत केले. लोकसभेला आम्हाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, त्यामुळे विधानसभेलाही आम्ही येऊ, असा समज आमच्यात निर्माण झाला, त्यामुळे आम्ही थोडे गाफील राहिलो."
'लाडकी बहीण योजना' बंद होण्याची घातली भीती
"विधानसभेच्या निवडणुकीवेळी हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन राज्याच्या निवडणुकांची वेळापत्रकं बदलण्यात आली, आम्ही त्याचवेळी सुप्रिम कोर्टात जायला हवं होतं आणि हरियाणाबरोबरच या निवडणुका घ्या असं सांगायला पाहिजे होतं. त्याचा फायदा महायुतीने घेतला. निवडणुका पुढे ढकलल्या. दरम्यान लाडकी बहिणी योजना जाहीर करण्यात आली अन् देशाच्या इतिहासात पुढच्या 3 महिन्यांचे पैसे देण्यात आले, असं कधी होत नाही, ते पहिल्यांदा झालं. फक्त मतांसाठी या योजनेतर्फे महिलांच्या खात्यात प्रत्यक्ष पैसे देण्यात आले. याचा परिणाम थेट निकालांवर झाला", असंही पाटील म्हणाले.
सतेज पाटील पुढे म्हणाले की, "सरकारी पैशांवर प्रत्येक जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिण योजनेचे मेळावे घेण्यात आले. ही योजना आम्ही आणलीय, असा प्रचार जाहिरात, सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत केला, महाविकास आघाडीचं सरकार आलं की, ही योजना बंद होईल, अशी भीती महिला-भगिनींच्या मनात निर्माण करण्यात आली. त्यामुळे ते यशस्वी झाले", असंही त्यांनी सांगितलं.
हे ही वाचा : मुख्यमंत्री फडणवीसांकडून मंत्री संजय शिरसाट यांची पाठराखण, म्हणाले, कधी कधी...
हे ही वाचा : BMC Elections: उद्धव-राजसाठी चक्रव्यूह, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप अलर्ट, आज ठरणार प्लॅन
