नवीन ॲपमुळे प्रवाशांना तत्काळ आवश्यक माहिती मिळेल आणि सुरक्षाविषयक जागरूकता देखील वाढेल. स्थानिक भाषांमध्ये माहिती उपलब्ध होत असल्याने प्रवासाचं नियोजन अधिक सोपं आणि सोयीचं ठरेल. पर्यटन व स्थानिक ठिकाणांविषयी मार्गदर्शन देखील मिळणार आहे. मोठ्या अक्षरांचा पर्याय, हाय कॉन्ट्रास्ट थीम आणि सोपं नेव्हिगेशन यामुळे सर्व वयोगटातील व विविध क्षमतेच्या प्रवाशांसाठी हे ॲप उपयुक्त ठरेल, असा विश्वास कोकण रेल्वेने व्यक्त केला आहे.
advertisement
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाचा मुहूर्त ठरला! सिडकोकडून घडमोडींना वेग
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, नवीन ॲपमुळे प्रवाशांना आता ट्रेनचे रिअल टाईम रनिंग स्टेटस, वेळापत्रक तसेच स्टेशनवरील सुविधा, खानपान सेवा यांची माहिती त्वरित उपलब्ध होणार आहे. महिलांसाठी स्वतंत्र सुविधा, सुरक्षाविषयक फिचर्स आणि हेल्पलाईन्ससुद्धा यात देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पर्यटक व चित्रपट चित्रीकरणासाठी प्रसिद्ध स्थळांची माहिती, फोटोंसह तपशीलवार माहिती उपलब्ध आहे. हेल्प डेस्कमार्फत थेट तक्रारी नोंदवणे, चौकशी करणे सुलभ झालं आहे. याशिवाय, कोकण रेल्वेचा इतिहास, टप्पे आणि यशोगाथाही प्रवाशांना या ॲपमध्ये पाहायला मिळतील.