TRENDING:

कोकण हादरलं! निळ्या बॅगेत चिमुकला मृतदेह कोंबून आंब्याच्या बागेत पेटवला, दीड महिना सडत होती बॉडी

Last Updated:

निळ्या रंगाच्या बॅगेत मृतदेह कोंबून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तो पेटवून देण्यात आल्याचे दिसून येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राजेश जाधव, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. देवखेरकी गावातील एका हापूस आंब्याच्या बागेत मानवी हाडांचा जळालेला सापळा सापडल्याने संपूर्ण कोकण हादरले आहे. एका निळ्या रंगाच्या बॅगेत हा मृतदेह भरून तो जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीला शोधणे हे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

advertisement

शांत आणि निसर्गरम्य कोकणातील देवखेरकी परिसरात एका क्रूर हत्याकांडाचे भीषण वास्तव समोर आले आहे. एका हापूस आंब्याच्या बागेजवळ जंगलात मानवी हाडांचा जळालेला सापळा आढळून आला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हे अवशेष 12 ते 13 वर्षे वयोगटातील एका मुलाचे किंवा मुलीचे असण्याची शक्यता आहे. निळ्या रंगाच्या बॅगेत मृतदेह कोंबून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तो पेटवून देण्यात आल्याचे दिसून येत आहे.

advertisement

दीड महिन्यापासून मृतदेह बागेतच, मजुराने का लपवलं? 

या घटनेमागील खरी गुंतागुंत दीड महिन्यांपूर्वीच सुरू झाली होती. बागेत काम करणाऱ्या एका मजुराला  त्यावेळी हा मृतदेह दिसला होता. मृतदेहाचे डोके बॅगेच्या बाहेर होते आणि अवस्था अत्यंत भीषण होती. मात्र, प्रचंड भीतीपोटी या मजुराने दीड महिना कोणालाही काहीही सांगितले नाही. अखेर, मनावरचा ताण असह्य झाल्याने त्याने बागेच्या मालकाला ही हकिगत सांगितली आणि या भीषण प्रकरणाचा उलगडा झाला.

advertisement

फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दीड महिना उलटल्याने मृतदेह पूर्णपणे जळून त्याचा केवळ सांगाडा उरला आहे. घटनास्थळी जळालेल्या निळ्या बॅगेचे अवशेष आणि दोन लोखंडी रॉड सापडले आहेत, जे या कृत्यात वापरले गेल्याचा संशय आहे. रत्नागिरी येथून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून, हाडांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

advertisement

खूनाचा  प्रयत्न की अघोरी कृत्य?

ज्या क्रूरतेने हा मृतदेह बॅगेत भरून जाळला गेला आहे, त्यावरून हा पूर्वनियोजित खून असल्याचा संशय बळावला आहे. इतक्या लहान वयाच्या मुलाची किंवा मुलीची हत्या कोणी आणि का केली? जिल्ह्यातून किंवा आसपासच्या भागातून कोणी बालक बेपत्ता आहे का? याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे देवखेरकी परिसरात भीतीचे सावट पसरले असून, गुन्हेगाराला लवकरात लवकर बेड्या ठोकण्याची मागणी होत आहे.

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोशल मीडियावरून घेतली माहिती, नोकरी सोडून उभारला बिस्किट व्यवसाय, महिन्याला 2 लाख रुपयांची उलाढाल
सर्व पहा

व्हॉलीबॉलचा 'तो' डाव ठरला शेवटचा! बॉल काढायला पाण्यात उतरला, दुसऱ्या दिवशी बॉडी...

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कोकण हादरलं! निळ्या बॅगेत चिमुकला मृतदेह कोंबून आंब्याच्या बागेत पेटवला, दीड महिना सडत होती बॉडी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल