पण रवींद्र चव्हाणांचं हे एक वक्तव्य भाजपला चांगलंच महागात पडल्याचं दिसून येत आहे. कारण लातूरमध्ये काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली आहे. ७० पैकी ५१ जागांचे सुरुवातीचे कल हाती आले असून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी विजयाच्या उंबरठ्यावर आहे. इथं काँग्रेसनं ३० जागांवर आघाडीवर आहे. तर वंचित बहुजन आघाडी चार जागांवर आघाडीवर आहे. इथं बहुमताचा आकडा ३६ आहे. त्यामुळे काँग्रेसला लातूरमध्ये आपला महापौर करण्यासाठी अवघ्या दोन जागांची आवश्यकता आहे.
advertisement
लातूर महानगरपालिका मतमोजणी निकाल
दुपारी एक वाजेपर्यंत लातूरमध्ये ५१ जागांचे कल हाती आले आहेत. यात काँग्रेस ३० जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप १७ जागांवर पुढे आहे. इथं वंचितनं खातं उघडलं असून ४ जागांवर आघाडी उघडली आहे. हाच ट्रेंड कायम राहिला तर पुढील काही वेळात इथं काँग्रेसचा मोठा विजय बघायला मिळू शकतो.
२०१७ च्या निवडणूकीत लातूरमध्ये भाजपनं काँग्रेसला टफ फाईट दिली होती. ३६ उमेदवार निवडून आणत एकहाती सत्ता स्थापन केली होती. पण यंदाच्या निवडणुकीत भाजपला विजयी घौडदौड राखता आली नाही. रवींद्र चव्हाणांनी केलेलं एक वक्तव्य भाजपच्या पराभवाचं कारण ठरलं आहे. इथं विलासराव देशमुखांच्या निष्ठावंतांनी एकगठ्ठा मतं काँग्रेसच्या पारड्यात टाकल्याचं बोललं जातंय.
