सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये टफ फाईट सुरू आहे. सर्वाधिक ९ जागांवर भाजपनं आघाडी घेतली आहे. तर त्या पाठोपाठ ८ जागांवर काँग्रेसनं मुसंडी मारली आहे. इथं राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील आपला करिष्मा दाखवण्यात काही प्रमाणात यश येताना दिसत आहे. इथं अजित पवार गटाला ५ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर शरद पवार गटाला एका जागेवर आघाडी मिळवण्यात यश आलं आहे. इतर दोन जागांवर अपक्ष उमेदवारांनी मुसंडी मारली आहे.
advertisement
लातूर महानगरपालिकेच्या 70 जागांसाठी गुरुवारी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. इथं सरासरी 60 टक्के मतदान झालं होतं. लातूर महानगरपालिकेत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात मुख्य लढत झाली होती. या पालिकेत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होती. एकूण सर्व पक्षांचे मिळून 369 उमेदवार रिंगणात होते. एकूण 70 जागांपैकी विजयासाठी 36 जागांची आवश्यकता आहे. 36 हा बहुमताचा आकडा आहे.
लातूर महानगरपालिका निवडणुकीत एकूण 70 जागांसाठी 369 उमेदवार रिंगणात आहेत. पालिकेवर सत्ता काबिज करण्यासाठी 36 जागांची आवश्यकता आहे. या निवडणुकीत काँग्रेस 65, वंचित बहुजन आघाडी 5 जागा लढवत आहे. या दोन्ही पक्षांची युती आहे. त्याचबरोबर भाजप 70 जागा लढवत आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गट 60 जागांवर निवडणूक लढवत आहे.
