महापौरपदासाठी काँग्रेसची संभाव्य नावे:
१) कांचन अजनीकर: कांचन अजनीकर या काँग्रेसच्या अनुभवी आणि निष्ठावान नगरसेविका आहेत. त्यांची प्रभागातील पकड आणि पक्ष संघटनेतील काम पाहता, त्यांना महापौरपदाची पहिली पसंती मिळण्याची दाट शक्यता आहे.
२) जयश्री सोनकांबळे: आरक्षण सोडतीनंतर जयश्री सोनकांबळे यांचे नाव देखील आघाडीवर आले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील एक सुशिक्षित आणि सक्रिय चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
advertisement
३) मनिषा बसपुरे: मनिषा बसपुरे या देखील महापौरपदाच्या शर्यतीत आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी असलेले जवळचे संबंध आणि प्रशासकीय कामाची जाण यामुळे त्यांचे नाव चर्चेत आहे.
लातूर महापौरपद अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांची संधी हुकली आहे. काँग्रेसकडे ४३ पेक्षा जास्त जागांचे स्पष्ट बहुमत असल्याने महापौर निवड ही केवळ औपचारिकता उरली आहे. लातूरच्या राजकारणात 'देशमुख' कुटुंबाचा शब्द अंतिम असतो. त्यामुळे देशमुख कुटुंब कोणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ घालतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
