TRENDING:

Latur Bus Accident : लातूर-नांदेड बसचा भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत एसटीचा चेंदामेंदा, 29 प्रवासी जखमी

Last Updated:

लातूरहून नांदेडला जाणाऱ्या बसला ट्रकने धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 29 प्रवासी जखमी झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सचिन सोळुंखे, प्रतिनिधी
लातूर-नांदेड बसचा भीषण अपघात, 29 प्रवासी जखमी
लातूर-नांदेड बसचा भीषण अपघात, 29 प्रवासी जखमी
advertisement

लातूर, 16 ऑगस्ट : लातूरहून नांदेडला जाणाऱ्या बसला ट्रकने धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 29 प्रवासी जखमी झाले आहेत, तर 12 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना पुढील उपाचारासाठी लातूरला हलवण्यात आलं आहे. लातूर जिल्ह्यातील सांगवी सुनेगावजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातामुळे लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

advertisement

एमएच 24 एयू 8160 क्रमांकाची बस लातूरहून नांदेडकडे जात होती. तर एमएच 26 बीई 4576 क्रमांकाचा ट्रक नांदेडहून लातूरकडे येत होता. यावेळी अहमदपूर तालुक्यातील सांगवी-सुनेगाव येथे मेनवल पुलाजवळ बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या धडकेत बसमधील 29 प्रवासी जखमी झाली. अपघाताचा आवाज आणि आरडाओरडा ऐकून आजूबाजूला असलेले ग्रामस्थ धावून आले.

advertisement

अपघातानंतर घटनेची माहिती तात्काळ शासकीय यंत्रणेला कळवण्यात आली आणि युद्धपातळीवर मदतकार्य सुरू झालं. या अपघातातील जखमींना अहमदपूरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. 29 प्रवाशांवर तात्काळ उपचार करण्यात आले. 12 गंभीर जखमींना उपचारासाठी लातूरला पाठवण्यात आलं आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दर तेजीत, गुळ आणि शेवग्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

अपघाताची घटना लक्षात येताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली, आणि जखमींना उपचारासाठी अहमदपूर ग्रामीण रुग्णालयाकडे हलवण्यासाठी वेगात काम केले. यामुळे जखमी व्यक्तींना तात्काळ औषध उपचार मिळाले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Latur Bus Accident : लातूर-नांदेड बसचा भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत एसटीचा चेंदामेंदा, 29 प्रवासी जखमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल