लातूरमधील जलील पठाण आणि संजय जाधव या दोन जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांना पोलिसांनी अटक केली. पेपर फोडण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पाच लाख रुपये घेऊन पेपर फोडत असल्याची माहिती देखील समोर आलीय. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसात चार जणांवर गुन्हा दाखल असून यातील दोघांना पोलिसांनी अटक केलीय तर संशयित म्हणून आणखी दोघांना पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतलंय.
advertisement
दरम्यान आरोपी इरण्णा कोनगलवार याच्या घराची पोलिसांनी झडती घेतली, त्यावेळी संजय जाधव आणि जलील पठाण यांचे मोबाईल मिळालेत. त्यात काही विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट, विद्यार्थ्यांसोबत केलेलं चॅटिंग आणि पैशांची देवाण-घेवाण अशा अनेक आक्षेपार्ह बाबी मिळाल्याची माहिती समोर आलीय. यासोबतच ज्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट मिळाले त्यांची देखील ATS कडून चौकशी करण्यात येणार असून प्राथमिक स्वरुपात तीन पालकांची चौकशी देखील करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती समोर आलीय.
पेपरफुटी प्रकरणाचा काळाबाजार
- संजय जाधव, जलील पठाण या शिक्षकांना नांदेड एटीएसकडून अटक
-आरोपीच्या घराची पोलिसांकडून झाडाझडती
- 'नीट'च्या 12 विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट आणि सहा मोबाईल जप्त
- जलील पठाण हा विद्यार्थी हेरायचा, आमिष दाखवून रेट द्यायचा
- 5 लाख रूपयांच्या मोबदल्यात आरोपी विद्यार्थ्यांचे गुण वाढवायचे
- इराण्णा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र मागवायचा
-प्रवेश पत्र मिळाल्यानंतर 50 हजारांपासून बोली सुरु व्हायची, 5 लाखांत पूर्ण काम
- विद्यार्थ्यांकडून अॅडव्हान्स मिळाले की ते हॉलतिकीट आरोपी संजय जाधवकडे पाठवलं जायचं.
- लातुरातील शिक्षकांच्या सबएजंटच्या माध्यमातून पैशांची देवाण-घेवाण
- लातूरमध्ये चौकशी करताना दोन सबएजंटची नावं समोर
-पेपरफुटी प्रकरणात एकूण 6 जणांचा समावेश
