TRENDING:

Maharashtra politics : भाजपला राज्यात मोठा धक्का; नेत्यानं सोडली साथ

Last Updated:

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. भाजपच्या आणखी एका नेत्यानं पक्षाची साथ सोडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लातूर, नितिन बनसोडे, प्रतिनिधी : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. शनिवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर आता भाजपला देखील मोठा धक्का बसला आहे. उदगीर मतदारसंघात भाजपसाठी हा दुसरा धक्का आहे. काही दिवसांपूर्वीच माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपची साथ सोडत हाती तुतारी घेतली होती, त्यांतर आता भाजपचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष  लक्ष्मीकांत पाटील कौळखेडकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून, त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
News18
News18
advertisement

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उदगीर मतदार संघात भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी हातात तुतारी घेतल्यानंतर आता उदगीर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील कौळखेडकर यांनी देखील भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते काँग्रेसडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत.

लिंगायत समाजाचे नेतृत्व म्हणून त्यांची उदगीर मतदारसंघात ओळख आहे, अचानक निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला सोडचिठ्ठी देत त्यांनी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लक्ष्मीकांत पाटील कौळखेडकर यांच्या राजीनाम्यामुळे या मतदारसंघात भाजपला दुसरा मोठा धक्का बसला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दर तेजीत, गुळ आणि शेवग्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

दरम्यान त्यापूर्वी शनिवारी महायुतीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
Maharashtra politics : भाजपला राज्यात मोठा धक्का; नेत्यानं सोडली साथ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल