निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी
लातूरच्या चिंचोलीराव वाडी येथील जवाहरलाल नवोदय विद्यालयातील सातवीची विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे हिचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. विद्यार्थी काँग्रेसने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. केवळ आत्महत्येचा ठपका ठेवून हे प्रकरण बंद करणे अन्यायकारक असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. शाळेतील मानसिक ताण, शैक्षणिक दबाव आणि समुपदेशनाचा अभाव यामुळेच ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप विद्यार्थी काँग्रेसने केलाय.
advertisement
मुलीचा मृत्यु आत्महत्येने नाही तर...
नवोदय विद्यालयात अनुष्का पाटोळे या मुलीचा मृत्यु आत्महलोने झालेला नाही, तर शाळेतील मानसिक ताण, शैक्षणिक दबाव, समुपदेशनाचा अभाव तसेच प्रशासनाची दुर्लक्षाची भूमिका कारणीभूत असण्याची शक्यता आहे, असं विद्यार्थी काँग्रेसने म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक
या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून शाळा प्रशासन आणि शिक्षकांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दोषींवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय व मदत मिळावी, यासाठी रोहित बिराजदार, महेश सोळंके आणि इतर पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे.
