सोमनाथ दयानंद हिप्परगे (२२), अभिजित शाहुराज इंगळे (२३) आणि दिगंबर दत्ता इंगळे (२७) असं मृत पावलेल्या तीन मित्रांची नावं आहेत. हे तिघेही मित्र एकाच दुचाकीवरून लातूर येथे सोमनाथच्या भावाला भेटण्यासाठी गेले होते. रात्री उशिरा ते आपल्या गावी परत येत असताना औसा-लामजना रस्त्यावरील करजगाव पाटीजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव कारने जोरदार धडक दिली.
advertisement
उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू
अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच किल्लारी पोलीस तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना औसा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला.
मृतांपैकी दिगंबर इंगळे हा विवाहित होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर, अभिजित इंगळे आणि सोमनाथ हिप्परगे हे दोघे अविवाहित होते. विशेष म्हणजे, अभिजित हा त्याच्या आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. सोमवारी दुपारी तिन्ही मित्रांवर सरवडी गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या तीन मित्रांची घरे शेजारी-शेजारी आहेत. तिघंही बालपणापासून एकमेकांना ओळखतात. अशा तीन मित्रांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर दुःखाचे सावट पसरले आहे.