मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भुजबळांवर हल्लाबोल केला. जरांगे पाटील म्हणाले की, भुजबळांना आवरा, ते महाराष्ट्र पेटवतायत. त्यांनीच माझ्याविरोधात नेते उभा केले आहेत. बैठकीबाबत मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं की, ओबीसी नेते विरोधच करणार आहेत. ते कधीही सकारात्मक होणार नाही. त्यात दुमत नाही.
आमची मागणी ओबीसी आरक्षणाची आहे.फक्त सगे सोयरेची अंमलबजावणी झाली नाही. तेच आमचं म्हणणं आहे की लवकर अंमलबजावणी करा 13 तारखेपर्यत. सरकार आमचा गेम करणार असं वाटत नाही. सत्ताधारी, विरोधक यांना गांभीर्य नाही. त्यांना कधीही गरीबांशी देणं घेणं नाही. महाराष्ट्र पेटता राहणार नाही असं महायुती आणि महाविकास आघाडीचं जरी हे स्वप्न असलं तरी भुजबळचं स्वप्न राज्य पेटता राहण्याचं आहे. छगन भुजबळांना माझ्या विरोधात सरकारने उभं केलं आहे असा गंभीर आरोपही जरांगे पाटील यांनी केला.
advertisement
प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, त्यांचं म्हणणं काय आहे आम्हाला माहीत नाही. त्यांना तिथे बांधून जरी ठेवलं तरी आम्हाला काहीही देणं घेणं नाही.महाराष्ट्र पेटता राहणार नाही,गैरसमजातून बाहेर या फक्त भुजबळला आवरा म्हणजे पेटता राहणार नाही. आम्ही महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचेही नाही. आम्ही कुणाच्याही फायद्यासाठी नाही तुम्ही नीट राहा,तुम्ही धनगर आरक्षणाचं आश्वासन दिलं. आरक्षण दिलं का त्यांना? आम्ही उभे राहू किंवा पाडू, फडणवीस यांनीच भुजबळांना बळ दिलंय. आम्ही शांततेत काम करतो. तो माणसांना आंदोलनं करायला लावतो.
धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं की बीडच्या रॅलीला परवानगी नाकारली नाही. यावर जरांगे पाटलांनी म्हटलं की, त्यांचं कौतुक मराठ्यांच्या गोरगरिबांना बीडमध्ये त्रास देऊ नका असेच काम करा. मराठ्यांचे कार्यक्रम उधळून लावू नका. मराठ्यांच्या लोकांना मारू नका. आमच्या लोकांना शिवीगाळ करू देऊ नका. तुम्ही परवानगीच्या बाजूने जसं पटकन बोलललात. तुम्ही मराठ्यांवर अन्याय केला तर मराठे कसे तुम्हाला सोडतील. तुम्ही मराठ्यांना त्रास दिला तर मी मराठ्यांच्या बाजूने उभे राहिल. तुम्ही जातीयवाद मोडून टाकण्यासाठी उभे राहा. मराठे तुम्हाला कधीही उचलून धरतील. मराठ्यांच्या बाजूने उभे राहा. तुम्ही वाईट वागाल तर मराठे तुम्हला सत्तेपासून दूर करतील
ओबीसीवर अन्याय होणार नाही असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले पण त्यांनी असंही म्हणावं मराठ्यांवर अन्याय होणार नाही. 10 टक्के आरक्षण टिकणार नाही ते आम्हाला मान्य नाही,मराठा मागास सिद्ध झाला आहे मग आम्हाला 50 टक्क्यांच्या वर कशाला नेऊन घालता आमची जात जे मागेल ते आम्ही घेऊ असं जरांगे पाटील म्हणाले.
आम्ही आतापर्यंत संयम ठेवला आम्हीही आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी बघू. आम्ही भुजबळ यांच्या विरोधात बोलतो मग बाकीचे ओबीसी नेते का फुकट भांडण ओढून घेतात. बाकीचे ओबीसी नेते विष पेरत नाही म्हणून आम्ही त्यांना बोलत नाही,भुजबळ धनगर समाजाच्या बाजूने बोलत नाही तरीही तुम्ही त्याचं का ऐकता. सरकारने आम्हाला ढकलायची चूक करू नये. आरक्षणासाठी मराठा नेते ओबीसी नेत्यांसारखे एकत्र येत नाही हीच आमची शोकांतिका आहे असंही जरांगे पाटलांनी म्हटलं.
