TRENDING:

Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या अडचणी वाढणार, कोर्टाने जारी केलं अटक वॉरंट

Last Updated:

राज ठाकरे यांच्याविरोधात 16 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात निलंगा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलंय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लातूर :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. १६ वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. निलंगा न्यायालयाने हे अटक वॉरंट जारी केलंय. राज ठाकरे यांना स्वत: न्यायालयात हजर रहावं लागणार आहे. तरच हे वॉरंट रद्द होईल. अजामीनपात्र असं अटक वॉरंट आहे. महामंडळाच्या बसगाडीची तोडफोड आणि जाळपोळ प्रकरणी राज ठाकरे यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल केला होता.
News18
News18
advertisement

महामंडळाच्या बसगाडीची तोडफोड आणि जाळपोळ प्रकरण १६ वर्षे जुनं आहे.  निलंगा न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे.  दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. यापूर्वी ही राज ठाकरे याच प्रकरणी निलंगा न्यायालयात हजर झाले होते.

2008 मध्ये निलंगा येथील मनसे कार्यकर्त्यांनी उदगीर मोडवर महामंडळाच्या बसगाडीची जाळपोळ केली होती. 2008 मध्ये उदगीर मोडवरती महामंडळाच्या बसगाडीची जाळपोळ घटनेप्रकरणी खटला दाखल केला होता.  या प्रकरणात निलंगा पोलिसांनी आठ जणांवर गुन्हे दाखल केले होते. यात राज ठाकरे यांचा देखील समावेश होता. यापूर्वी न्यायालयाने जामीन रद्द केल्याने राज ठाकरे यांना न्यायालयात हजर राहावे लागले होते. वकिलांनी राज ठाकरे यांना प्रत्येक तारखेला हजर राहता येणार नसल्याने हे प्रकरण, मुंबईला वर्ग करण्याची, विनंती केली होती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Krushi Market: मक्याचे दर भुईसपाट! कांदा, सोयाबिनला रविवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

निलंगा इथं मनसेच्या कार्यकर्त्यांनी २००८ मध्ये उदगीर महामंडळाच्या बसची जाळपोळ करण्यात आली. निलंगा पोलीस ठाण्यात ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज ठाकरे यांचा त्यात समावेश होता. निलंगा न्यायालयाने जामीन रद्द केल्यानं त्यांना न्यायालयात हजर रहावं लागलं होतं. राज ठाकरे आणि मनसेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख अभय सोळुंके हजर राहत नसल्याने पुन्हा त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. आता त्यांना निलंगा न्यायालयात हजर करावं लागणार आहे. निलंगा न्यायालयात राज ठाकरे हजर न राहिल्यास त्यांच्या अडचणी वाढू शकतात.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या अडचणी वाढणार, कोर्टाने जारी केलं अटक वॉरंट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल