TRENDING:

Latur : वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन गेला दहावीच्या पेपरला; केंद्र होतं 100 किमीवर, बोर्डाने गावातच केली सोय

Last Updated:

वडिलांचे निधन गुरुवारी सायंकाळी झाले. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार केले गेले. त्यानंतर विद्यार्थी तासाभरात दहावीच्या पेपरसाठी गेला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लातुर : दहावीच्या परीक्षेला १ मार्चपासून सुरूवात झालीय. परीक्षेच्या पहिल्याच पेपरला एका विद्यार्थ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. पेपरच्या आदल्या रात्री वडिलांचे निधन झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पेपरच्या तासभर अगोदर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वडिलांवर अत्यंसस्कार करून विद्यार्थ्याने पेपर दिला. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यात ढाळेगाव इथं राहणाऱ्या ऋषिकेश रामनाथ पुरी याने वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन मराठीचा पेपर दिला.
News18
News18
advertisement

ऋषिकेशचे परीक्षा केंद्र दुसऱ्या तालुक्यात होते. ते अंतर जास्त होते. वडिलांवर अंत्यसंस्कार करून पुन्हा पेपर देण्यासाठी जाणं शक्य नव्हतं. शिक्षण विभागाला याबाबत कळवल्यानंतर योग्य त्या परवानग्या देत त्याची गावातीलच केंद्रावर परीक्षेची सोय करण्यात आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव इथला ऋषिकेश पुरी हा लातुर तालुक्यात बोरी सलगरा बुद्रुक इथं मामाकडे शिक्षणासाठी राहतो. दहावीच्या परीक्षेसाठी त्याचे केंद्र बोरी इथं होते. पण गुरुवारी सायंकाळी त्याच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. ऋषिकेश त्याच्या गावी रात्री पोहोचला. तर वडिलांवर अंत्यसंस्कार शुक्रवारी सकाळी करण्यात आले.

advertisement

वडिलांवर सकाळी १०.३० वाजता अंत्यसंस्कार केल्यानंतर ऋषिकेशचे परीक्षा केंद्र १०० किमी दूर होते. त्यामुळे पेपर देता येणार नाही असं त्याला वाटलं. वडिलांच्या निधनामुळे त्याची मानसिक स्थितीही नव्हती. पण नातेवाईकांनी शिक्षण विभागाला ही अडचण कळवली. त्यानंतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऋषिकेशची भेट घेत त्याला सर्व परवानग्या मिळवून देत जवळच्या परीक्षा केंद्रात पेपर देण्याची सोय केली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुम्ही कधी खाल्लीये का मासे चकली? दुर्गा यांचा व्यवसाय हिट,महिन्याला 1 लाख कमाई
सर्व पहा

वडिलांचे निधन गुरुवारी सायंकाळी झाले. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार केले गेले. त्यानंतर तासाभरात वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर ऋषिकेश परीक्षेला गेला.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
Latur : वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन गेला दहावीच्या पेपरला; केंद्र होतं 100 किमीवर, बोर्डाने गावातच केली सोय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल