काय आहे प्रकरण?
उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मारवाड कॉलनी परिसरात कुंठण खान्यावर उदगीर ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. यामध्ये आठ जणांना ताब्यात घेवून सहा आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत, तर दोन पीडित महिलेची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मारवाड कॉलनी सोमनाथपूर परिसरात देह व्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ग्रामीण पोलिसांनी धाड टाकली असता दोन आरोपी महिला, दोन पीडित महिला, दोन पुरुष व दोन अल्पवयीन मुलांस पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपी महिला व आरोपीची मुलगी यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशाचे अमिष दाखवून देह व्यापारास प्रवृत्त करून घेऊन कुंठणखाना चालवण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन कुंठणखाणा चालवताना मिळून आले.
advertisement
वाचा - Crime : भरदिवसा ट्रक चालकाच्या डोक्यात झाडल्या 6 गोळ्या, जागीच मृत्यू
अल्पवयीन मुलांची सुधारगृहात रवानगी
पोलीस उपनिरीक्षक रवी मुंढे यांच्या फिर्यादीवरुन कुंठणखाना चालवणाऱ्या कल्लुबाई नरसींह माने, मुलगी बालिका नरसींह माने, विठ्ठल मारोती केंद्रे (वय-30) रा.तळ्याची वाडी ता. कंधार, विठ्ठल भगवान नरसींगे (वय-35) रा. निळकंठ, ता. औसा. व दोन अल्पवयीन बालक अशा आठ जणांवर शनिवारी रात्री अकराच्या सुमारास देह व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन पीडित महिलांना रात्री बारा वाजता येथील प्रथम वर्ग न्यायदिंडाधिकार्यांसमोर हजर केले असता त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना लातूरच्या महिला सुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले. बाकी सहा आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.
