घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना लातूर लगत असलेल्या पाखर सांगवी गावातील आहे. या गावात ग्रामसभा सुरू होती. याचवेळी एका तरुणानं गोठा मंजुरीसाठी पाच हजार, घरकुलासाठी पाच हजार आणि लोकवाटा म्हणून 1200 रुपये कशासाठी घेता असा प्रश्न विचारला. तरुणाने विचारलेल्या प्रश्नाचा राग मनात धरून त्याला मारहाण करण्यात आली आहे.
advertisement
ग्रामसभा संपल्यानंतर या तरुणाला सरपंच आणि इतर काही जणांनी तुला ग्रामपंचायतीचा हिशोब देतो म्हणून बोलून घेतले. त्यानंतर या तरुणावर चाकूनं हल्ला करत त्याला जबर मारहाण करण्यात आली. जखमी तरुणानं घटनेनंतर पोलीस स्टेशन गाठत तक्रार केली. संबंधित तरुणाच्या तक्रारीवरून नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
घटनेनं खळबळ
केवळ ग्रामसभेत पैशांचा हिशोब मागितल्यानं या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्याच्यावर चाकू हल्ला देखील करण्यात आला आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
