नाशिक : नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कायद्याचं रक्षण करणाऱ्या वकिलाला पोलिसाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात एका पोलिसाकडून वकिलाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेमुळे नाशिकमधील वकील संघटनेनं निषेध व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये सोमवारी दुपारी ही घटना घडली. अँड तुषार दोंदे असं मारहाण झालेल्या वकिलाचं नाव आहे. तर विश्वजीत राणे असं पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. विश्वजीत राणे हे जिल्हा रुग्णालयामध्ये आत्महत्या प्रकरणात पंचनामा लिहण्याचं काम करत होते. त्यावेळी पक्षकाराची बाजू ऐकून घेण्यासाठी वकील तुषार दोंदे तिथे गेले. त्यावेळी दोंदे आणि पोलीस कर्मचारी विश्वजीत राणे यांच्यामध्ये वाद झाला. वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. राणे यांनी तुषार दोंदे यांच्या कानाशिलात लगावली आणि तुला गुन्ह्या घेतो असं सांगून शिवीगाळ केली, या घटनेचा व्हिडीओ तुषार दोंदे यांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे.
advertisement
पोलीस कर्मचारी विश्वजीत राणे यांच्या मारहाणीमुळे वकील संघटनेमध्ये संतापाची लाट उसळली, जिल्हा न्यायालय बाहेर वकील संघटनाकडून निदर्शनं करण्यात आली. वकिलांना पोलीस अशी वागणूक देतात का? अशी विचारणा करत विश्वजीत राणे यांना निलंबित करून तत्काळ अटक करण्याची मागणी वकील संघटनेनं केली.
