19 तास शोधमोहीम
लष्कराचे जवान आणि वन विभागाचे अधिकारी शोधकार्यात उतरले. थर्मल ड्रोन, श्वानपथक यांचा वापर करून सुमारे 250 ते 300 अधिकारी आणि कर्मचारी संपूर्ण आर्टिलरी सेंटरचं जंगल पिंजून काढत होते. अखेर बुधवारी दुपारी सुमारे तीन वाजता श्रुतिकचा मृतदेह आर्टिलरीच्या जंगलात सापडला. श्रुतिकचे वडील गंगाधर हे लष्करात जवान असून, ते मूळचे कर्नाटकचे आहेत. एकुलता एक मुलगा आणि त्याच्यावर बिबट्य़ाचा हल्ला झाला, त्याला वाचवू शकलो नाही, यामुळे आई वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
advertisement
विशेष म्हणजे, ऑगस्ट महिन्यात वडनेर दुमाला येथे तीन वर्षांच्या आयुष भगत या बालकाचाही बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यावेळी नागरिकांच्या रोषानंतर वन विभागाने बिबट्याला पकडण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यानंतरही काहीच ठोस पावले उचलली गेली नाहीत आणि पुन्हा एकदा एका निष्पाप जीवाचा बळी गेला. त्यामुळे नागरिकांनी वन विभागाच्या सुस्त आणि निष्क्रिय कारभारावर संताप व्यक्त केला आहे.
२ वर्षांच्या चिमुकल्याला मंगळवारी संध्याकाळी वडनेर गेटजवळील कारगिल गेट परिसरात घराबाहेर खेळत असताना बिबट्याने ओढून नेलं होतं. श्रुतिकच्या आईच्या डोळ्यांसमोरच तिचा मुलगा बिबट्याने पळवला. त्यानंतर तातडीनं बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले. एकुलता एक मुलगा गमवल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.