TRENDING:

Lok Sabha Election : रायगड लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीत रस्सीखेच; कोणाचं पारडं जास्त जड?

Last Updated:

Lok Sabha Election : महायुतीमध्ये राडगड लोकसभा मतदारसंघासाठी तीन पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रायगड : लोकसभेसाठी भाजपने देशभरातून 195 उमेदवार जाहीर केले. त्यात महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नव्हता. यावरुन महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम असल्याचे दिसत आहे. भाजपने रायगड लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. पक्षविस्ताराचा भाग म्हणून शेकापचे पेण येथील माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या हाती दोन महिन्यांपूर्वी ‘कमळ’ दिलंय. त्यामुळं विद्यमान खासदार सुनील तटकरेंना उमेदवारी मिळणार की धैर्यशील पाटील यांना मिळणार? याची उत्सुकता जिल्ह्यातील मतदारांना आहे.
News18
News18
advertisement

सुनील तटकरे, खासदार, राष्ट्रवादी

तटकरे विद्यमान खासदार

अजित पवारांचे निकटवर्तीय

पक्षफुटीनंतरही अजित पवारांच्या बाजूनं उभे राहिले

धैर्यशील पाटील, नेते, भाजप

शेकापचे माजी आमदार

स्थानिक प्रश्नांची जाण

मतदारसंघातील जनतेशी दांडगा संपर्क

अनेक आंदोलनांमध्ये घेतला होता सहभाग

लोकसभा उमेदवारी डोळ्यासमोर ठेवून भाजप प्रवेश

तरूण तडफदार उमेदवार अशी प्रतिमा

रायगडमधून सुनिल तटकरे की धैर्यशील पाटील

advertisement

सुनिल तटकरे का?

सुनिल तटकरे विद्यमान खासदार आहेत. या भागातून विधानसभा आणि लोकसभेवर सुद्धालोकप्रतिनिधींकडून म्हणून निवडून आले आहेत.

अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात दोन गट होत असताना अजित पवारांच्या बाजूने उभे राहीले.

सुनिल तटकरे यांना स्वतःला राज्यसभेवर जाण्याची इच्छा आहे. पण ही जागा राष्ट्रवादीला सुटली तर सुनिल तटकरे यांचाच विचार केला जाईल.

advertisement

वाचा - मावळमध्ये कुणाच्या गळ्यात पडणार माळ? या दोघांमध्ये रस्सीखेच, महायुतीसाठी ठरणार डोकेदुखी

धैर्यशील पाटील का?

शेकापचे जुने आमदार राहीले आहेत. स्थानिक लोकांच्या प्रश्नांची जाण आहे. लोकांशी चांगला संपर्क आहे. आजवर अनेक आंदोलने केली आहेत.

भाजपमध्ये प्रवेश करताना लोकसभा उमेदवारी डोक्यात ठेवूनच प्रवेश देण्यात आला होता.

भाजपसाठी तरूण तडफदार आणि नवा उमेदवार ठरू शकतील धैरशिल पाटील.

advertisement

शिवसेनाही या जागेसाठी आग्रही

रायगड लोकसभा मतदारसंघात अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड आणि रत्नागिरी जिह्यातील गुहागर, दापोली या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी अलिबाग (महेंद्र दळवी), महाड (भरत गोगावले) आणि दापोलीमध्ये (योगेश कदम) शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार आहेत. तर पेण विधानसभा मतदारसंघ (रवी पाटील) भाजपकडे आहे. श्रीवर्धन मतदारसंघात अजित पवार गटाच्या आदिती तटकरे आमदार आहेत. गुहागर मतदारसंघात ठाकरे गटाचे आमदार (भास्कर जाधव) आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेनेनेही रायगड लोकसभा जागेसाठी आग्र धरला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Lok Sabha Election : रायगड लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीत रस्सीखेच; कोणाचं पारडं जास्त जड?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल