'जे वृत्त प्रसिद्ध झालं आहे ते चुकीचं आहे. ईव्हीएमसाठी कोणत्याती ओटीपीची गरज नसते. रिजल्ट बटण प्रेस केल्यानंतर काम होतं. निवडणूक आयोगाने आपली प्रक्रिया पूर्ण केली आहे. संबंधित वृत्तपत्रावर अब्रुनुकसानीची केस दाखल करण्यात आली आहे,' असं उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी सांगितलं आहे.
'ईव्हीएम अनलॉक करायला कोणताही ओटीपी लागत नाही, ईव्हीएम टेक्निकली फुल प्रुफ सिक्युअर आहे. दिलेली बातमी अत्यंत चुकीची आहे. आम्ही त्या वृत्तपत्राला चुकीची बातमी दिली म्हणून नोटीस दिली आहे', असं निवडणूक अधिकारी म्हणाल्या.
advertisement
वायकरांच्या नातेवाईकाकडे मोबाईल कसा?
'आम्ही काही लोकांना एनकोर टीमला मोबाईल वापरायला दिला होता. डेटा अपलोड करण्यासाठी आम्ही मोबाईल अलाऊड केला होता. पण संबंधित व्यक्तीकडे हा मोबाईल कसा पोहोचला, यावर आम्हीही एफआयआर दाखल केली आहे. आम्ही कुणालाही सीसीटीव्ही देणार नाही, जोपर्यंत कोर्टाच्या ऑर्डर येत नाहीत', असंही निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे.
'ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, ईव्हीएम हॅक व्हायचा प्रश्नच येत नाही. आमचा मोबाईल अनधिकृत व्यक्तीने वापरला आहे, याबाबत आम्ही तक्रार दिली आहे', अशी प्रतिक्रिया वंदना सूर्यवंशी यांनी दिली आहे.