TRENDING:

Loksabha Election Result 2024 : भाजप बहुमतापासून दूर; काँग्रेस-शरद पवार नवा डाव टाकण्याच्या तयारीत!

Last Updated:

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे कल आता स्पष्ट व्हायला सुरूवात झाली आहे. या कलांनुसार भाजपला मोठा धक्का बसताना दिसत आहे. यानंतर काँग्रेस आणि शरद पवार पुढचा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रशांत लिला रामदास, प्रतिनिधी
भाजप बहुमतापासून दूर; काँग्रेस-शरद पवार नवा डाव टाकण्याच्या तयारीत!
भाजप बहुमतापासून दूर; काँग्रेस-शरद पवार नवा डाव टाकण्याच्या तयारीत!
advertisement

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे कल आता स्पष्ट व्हायला सुरूवात झाली आहे. या कलांनुसार भाजपला मोठा धक्का बसताना दिसत आहे. 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला बहुमताचा आकडा गाठणंही कठीण होऊन बसलं आहे. दुपारी 12 वाजेपर्यंतचे कल पाहिले तर भाजप 238 जागांवर आघाडीवर आहे, तर एनडीएची मिळून 291 जागांची आघाडी झाली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला 92 जागांवर आघाडी मिळाली आहे. इंडिया आघाडी मिळून 231 जागांवर पुढे आहे.

advertisement

भाजप बहुमतापासून दूर असल्यामुळे आता काँग्रेसकडून मोठा डाव टाकण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. काँग्रेस पक्ष टीडीपी आणि नितीश कुमार या दोघांशीही चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय इंडिया आघाडीचे काही खासदार सत्ता स्थापनेसाठी कमी पडले, तर त्यांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्यावर येऊ शकते. 30 खासदार कमी पडले तर त्या पक्षांसोबत बोलण्याची जबाबदारी शरद पवार घेऊ शकतात, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दर तेजीत, गुळ आणि शेवग्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

बिहारमध्ये एकूण 40 जागांपैकी 15 जागांवर नितीश कुमारांची जेडीयू आघाडीवर आहे तर भाजपला 11 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर चंद्रबाबू नायडू यांची टीडीपी 16 जागांवर आघाडीवर आहे. जेडीयू आणि टीडीपी हे दोन्ही पक्ष सध्या एनडीएसोबत आहेत. या दोन्ही पक्षांना इंडिया आघाडीत आणण्यासाठी काँग्रेस आणि शरद पवारांकडून प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Loksabha Election Result 2024 : भाजप बहुमतापासून दूर; काँग्रेस-शरद पवार नवा डाव टाकण्याच्या तयारीत!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल