वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला राज्यात 7 जागांवर पाठिंबा जाहीर केला आहे, पण काँग्रेसने अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार दिला आहे. महाविकासआघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रकाश आंबेडकर बैठकांना उपस्थित राहिले, तसंच वंचितच्या प्रतिनिधींनीही बैठकीला हजेरी लावली, पण प्रकाश आंबेडकरांच्या वंचितचा महाविकासआघाडीमध्ये समावेश होऊ शकला नाही, त्यामुळे वंचितने त्यांचे उमेदवार घोषित केले आहेत.
advertisement
2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्येही अकोल्यात तिरंगी लढत झाली होती. भाजपच्या संजय धोत्रे यांचा या मतदारसंघात विजय झाला, तर प्रकाश आंबेडकर दुसऱ्या क्रमांकावर राहिले. काँग्रेसचे हिदायतुल्ला पटेल तिसऱ्या क्रमांकावर आले. 2019 ला संजय धोत्रे यांना 5,54,444 मतं मिळाली तर प्रकाश आंबेडकर यांनी 2,78,848 मतं घेतली. काँग्रेसच्या उमेदवाराला 2,54,370 मतं मिळाली होती.