मुंबई : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत, यातच भाजप मनसे युती बाबत सकारात्मक गोष्टी घडताना दिसून येत नाहीयेत, यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पासुन मुंबईतील लोकसभा मतदार दौरा सुरू केलाय, त्यामुळे मनसेची ही स्वबळावर लढण्याची तयारी सुरू आहे अशी चर्चा आहे.
मनसेकडून लोकसभेची जोरदार तयारी सुरू झाली आहे, मात्र मनसे - भाजप युती बाबात सकारात्मकता होत नसल्याने मनसेची स्वबळावर लढण्याची तयारी सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत, कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मुंबईतील लोकसभा मतदार संघात फिरत आहेत, त्यामुळे राज्यात मनसे स्वबळावर 13 ते 14 उमेदवार लढण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement
मुंबईतील मनसेचे लोकसभा संभाव्य उमेदवार
दक्षिण मुंबई - बाळा नांदगावकर
दक्षिण मध्य मुंबई - नितीन सरदेसाई
ईशान्य मुंबई - मनोज चव्हाण
उत्तर मुंबई - नयन कदम
उत्तर मध्य मुंबई - सजंय चित्रे किंवा संदीप दळवी
उत्तर पश्चिम मुंबई - शालिनी ठाकरे
मनसे राज्यातल्या या जागा लढण्याच्या तयारीत
पुणे
ठाणे
कल्याण डोंबिवली
भिवंडी
शिर्डी
सोलापूर
चंद्रपूर
मनसे स्वबळावर लढणार का? या प्रश्नावर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी आम्ही गेली 17 वर्ष स्वबळावरच लढलो आहोत, असं सूचक वक्तव्य केलंय, त्यामुळे मनसेची वाटचाल ही एकला चलो च्या दिशेन आहे अशी स्थिती आहे.
मनसे भाजप युती बाबात सकारात्मक चर्चा अजून झाल्या नाहीत, तसंच कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही, त्यामुळे राज ठाकरे यांचा मुंबईतील दौरा हा स्वबळाचाच आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.