TRENDING:

PM Narendra Modi : 'काँग्रेस आणि नकली शिवसेनेची लोक...', पंतप्रधान मोदींनी ठाकरेंना डिवचलं

Last Updated:

लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातून प्रचाराचा नारळ फोडला आहे. चंद्रपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातून प्रचाराचा नारळ फोडला आहे. चंद्रपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे, तसंच त्यांचा उल्लेख नकली शिवसेना असा केला आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचं उदाहरणही दिलं.
'काँग्रेस आणि नकली शिवसेनेची लोक...', पंतप्रधान मोदींनी ठाकरेंना डिवचलं
'काँग्रेस आणि नकली शिवसेनेची लोक...', पंतप्रधान मोदींनी ठाकरेंना डिवचलं
advertisement

'इंडिया आघाडीचे लोक दक्षिण भारताला वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत. सनातन धर्माला बनावट म्हणत आहेत, काँग्रेस आणि नकली शिवसेनेची लोक हे त्यांनाच महाराष्ट्रात बोलावून रॅली काढत आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले, मोदी दुसऱ्या राज्यात जातात आणि काँग्रेस आणि आर्टिकल 370 बद्दल का बोलतात. मला सांगा काश्मीर आपलं आहे की नाही? जेव्हा काश्मिरी लोकांची घरं जाळली जात होती, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे समोर आले आणि त्यांनी काँग्रेसचा विरोध केला होता. त्यावेळी बाळासाहेबांनी काश्मीरमध्ये काय घडलं म्हणून महाराष्ट्राचा काय संबंध असा विचार केला नाही. आज एकनाथ शिंदे हे त्यांच्या विचाराचा पक्ष चालवत आहे, याचा मला आनंद आहे', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

advertisement

advertisement

दहशतवादाला काँग्रेसने पोसलं

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विभाजन कुणी केलं? देश स्वतंत्र झाल्यानंतर काश्मीरमध्ये अडचणी काँग्रेसने उभ्या केल्या. आपल्या आजूबाजूला अनेक देश प्रगती करत आहेत, पण देश कुणामुळे अडचणीत आहे? देश कित्येक वर्ष दहशतवादाने ग्रासलेला होता. दहशतवाद्यांना कोण संरक्षण कोण देत होतं? काँग्रेस देत होती. माओवाद्याची लाल दहशत काँग्रेसमुळे वाढली. राम मंदिर निर्माणाचा विषय अनेक वर्षांपासून रखडलेला होता. राम मंदिराच्या कामात कोण अडथळा आणत होतं. राम मंदिराच्या कामाला विरोध करण्यासाठी कोर्टात जात होते. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर कुणी विरोध केला, बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न कुणी दिला नाही., या सगळ्या अडचणीचं एकच उत्तर आहे काँग्रेस, अशी टीका पंतप्रधानांनी केली.

advertisement

'महाविकासआघाडी सरकार कमिशनखोर', महाराष्ट्रातल्या पहिल्याच सभेत पंतप्रधान मोदींचा हल्ला

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
PM Narendra Modi : 'काँग्रेस आणि नकली शिवसेनेची लोक...', पंतप्रधान मोदींनी ठाकरेंना डिवचलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल