advertisement

PM Narendra Modi : 'महाविकासआघाडी सरकार कमिशनखोर', महाराष्ट्रातल्या पहिल्याच सभेत पंतप्रधान मोदींचा हल्ला

Last Updated:

PM Modi Election campaign in Chandrapur : लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात प्रचाराचा नारळ फोडला आहे. चंद्रपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभेतून उद्धव ठाकरेंच्या महाविकासआघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

'महाविकासआघाडी सरकार कमिशनखोर', महाराष्ट्रातल्या पहिल्याच सभेत पंतप्रधान मोदींचा हल्ला
'महाविकासआघाडी सरकार कमिशनखोर', महाराष्ट्रातल्या पहिल्याच सभेत पंतप्रधान मोदींचा हल्ला
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात प्रचाराचा नारळ फोडला आहे. चंद्रपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभेतून उद्धव ठाकरेंच्या महाविकासआघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. राज्यातलं महाविकासआघाडी सरकार कमिशनखोर असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणाची सुरूवात मराठीतून केली. चंद्रपूरमधून राम मंदिरासाठी लाकडं पाठवण्यात आलं होतं. चंद्रपूरमधून नव्या लोकसभेसाठीही लाकडं आली होती, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
इंडिया आघाडीवर घणाघात
'इंडी आघाडीने नेहमी देशाला अस्थिरतेमध्ये ढकललं आहे. एक स्थिर सरकार का असावं हे महाराष्ट्रापेक्षा जास्त कुणी सांगू शकत नाही. इंडिया आघाडी सरकार जेव्हा जेव्हा आलां तेव्हा महाराष्ट्रावर अन्याय झाला आहे. जेव्हा इंडिया आघाडीचे लोक षडयंत्र करून सरकारं आणली पण त्यांनी स्वत: चाच विकास केला, घराण्याचा विकास केला. कंत्राट कुणाला मिळालं पाहिजे, कसं मिळालं पाहिजे, यासाठी त्यांनी काम केलं', अशी टीका पंतप्रधानांनी केली.
advertisement
advertisement
'महाराष्ट्रात कोणताही प्रकल्प आला तर कमिशन द्या नाहीतर काम थांबवतो, असंच काम केलं आहे. या महाविकास आघाडीने जलयुक्त शिवार योजना थांबवली. समृद्धी महामार्गाला सुद्धा विरोधकांनी विरोध केला होता. मुंबईत मेट्रोचं काम थांबवलं होतं. पीएम आवास योजनेतून पैसे येऊन सुद्धा लोकांपर्यंत पोहोचू दिले नाही. महाराष्ट्रात कोणताही प्रकल्प आला तर कमिशन द्या नाहीतर काम थांबवतो, असंच काम केलं आहे. या महाविकास आघाडीने जलयुक्त शिवार योजना थांबवली. समृद्धी महामार्गाला सुद्धा विरोधकांनी विरोध केला होता. मुंबईत मेट्रोचं काम थांबवलं होतं. पीएम आवास योजनेतून पैसे येऊन सुद्धा लोकांपर्यंत पोहोचू दिले नाही', असा आरोप मोदींनी केला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
PM Narendra Modi : 'महाविकासआघाडी सरकार कमिशनखोर', महाराष्ट्रातल्या पहिल्याच सभेत पंतप्रधान मोदींचा हल्ला
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement