निवडणूक आयोगाच्या या कारवाईच्या आदेशावर संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. निवडणूक आयोग भाजपची शाखा आहे. मोदी ध्यानाला बसले तो प्रचार नाही का? कोण कारवाई करणार उद्या कळेल. आमच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
गृहमंत्रालयाकडून फोन
'काठावर ज्या निवडणुका होतील, दोन-पाच हजार वीस हजार, त्या ठिकाणी गृहमंत्रालयाकडून फोन गेले आहेत. ही माझी पक्की माहिती आहे. जयराम रमेश ज्या 150 लोकसभा मतदारसंघाची भाषा करत आहेत, त्यातले 12 मतदारसंघ महाराष्ट्रातले आहेत', असा दावा संजय राऊतांनी केला आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून उद्याच्या निकालाआधी मिठाई बनवायला सुरूवात झाली आहे, त्यावरही राऊतांनी निशाणा साधला. भाजप उद्या हारत आहे. लाडू बनवा, हलवा बनवा, बासूंदी बनवा. रगडा पॅटिस वाटा, फाफडा वाटा, उद्या घेऊन या. लोक तुमच्या पराभवाचा जल्लोष करतील', असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
advertisement
पंतप्रधान कोण होणार?
'नरेंद्र मोदी उद्या दुपारी 4 नंतर भूतपूर्व झालेले असतील. इंडिया आघाडी 24 तासात आपला पंतप्रधान निवडेल. आमच्यात सगळ्या विषयांवर चर्चा झाली आहे. आम्हाला काहीही अडचण नाही. निकाल लागल्यानंतर इंडिया आघाडीचा प्रत्येक नेता दिल्लीत पोहोचेल आणि 24 तासात पंतप्रधानपदाचा निर्णय होईल. इंडिया आघाडी पुढची 5 वर्ष देशाला स्थिर सरकार आणि स्थिर पंतप्रधान देईल आणि पंतप्रधान एकच असेल', असं संजय राऊत म्हणाले आहेत.
