TRENDING:

Loksabha Elections 2024 : ठाकरेंच्या कल्याण दौऱ्याचे पडसाद, श्रीकांत शिंदेंचं उद्धव-आदित्यना थेट चॅलेंज

Last Updated:

मुख्यमंत्र्यांचे पूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघावर उद्धव ठाकरेंनी लक्ष केंद्रीत केलं आहे. त्या अनुशंगाने उद्धव ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीचा दौराही केला. आता या दौऱ्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण : मुख्यमंत्र्यांचे पूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघावर उद्धव ठाकरेंनी लक्ष केंद्रीत केलं आहे. त्या अनुशंगाने उद्धव ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीचा दौराही केला. आता या दौऱ्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालं आहे. शनिवारी उद्धव ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये भेटीगाठी आणि भाषणांचा धडाका लावला. सात तासांच्या या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी कल्याणचा परिसर पिंजून काढला. गद्दारांना धडा शिकवण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी कल्याण डोंबिवलीमधल्या शिवसैनिकांना केलं आणि शिंदे पिता-पूत्रांवर जोरदार हल्लाबोल केला.
ठाकरेंच्या कल्याण दौऱ्याचे पडसाद, श्रीकांत शिंदेंचं उद्धव-आदित्यना थेट चॅलेंज
ठाकरेंच्या कल्याण दौऱ्याचे पडसाद, श्रीकांत शिंदेंचं उद्धव-आदित्यना थेट चॅलेंज
advertisement

'कल्याण लोकसभा मतदारसंघावर विशेष जबाबदारी आहे. नुसता गाडायचा नाही, पाताळात गाडायचा. असं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे की शिवरायांच्या पवित्र महाराष्ट्रामध्ये शिवरायांच्या भगव्याला कलंक लावणारे पुढच्या पिढ्यांमध्ये जन्माला येता कामा नयेत,' अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

उद्धव ठाकरेंचा हा दौरा संपताच कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे मीडियासमोर आले आणि त्यांनी ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका करत ठाकरे पिता-पूत्रांना कल्याणमधून लढण्याचं आव्हान दिलं. 'इकडे उद्धव ठाकरेंनी पण लढावं आणि आदित्य ठाकरेंनीही लढावं. कल्याणमधून लढायचं का कोपरीमधून लढायचं, त्याचा पण विचार करा, त्यासाठीही आम्ही तयार आहोत. दोघांपैकी ज्यांना लढायचं असेल त्यांनी कल्याणमधून लढा आणि जिंकून दाखवा,' असं आव्हान श्रीकांत शिंदे यांनी ठाकरेंना दिलं आहे.

advertisement

धनूभाऊंना विश्वास, 'बीडमध्ये महायुतीच्या ताई खासदार होणार', पण कोणत्या?

श्रीकांत शिंदेंच्या या आव्हानावर ठाकरे गटाने पलटवार करत लवकरच कल्याणचा उमेदवार जाहीर करणार असल्याचं सांगून टाकलं आहे. 'कल्याण शिवसेनेचाच आहे आणि खऱ्या शिवसेनेचाच राहील, डुप्लिकेट नाही. कल्याणची बांधणी पूर्णपणे होत आली आहे. लवकरच कल्याण लोकसभेचा उमेदवार जाहीर केला जाईल,' असं संजय राऊत म्हणाले.

advertisement

खरंतर कल्याणमधला संघर्ष ठाकरे आणि शिंदेंमध्ये सुरू आहे, पण या वादात भाजपनेही उडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. त्यातच ठाकरे गटाने शिंदेंची कोंडी करण्याकरता मिशन कल्याण आखल्याचं दिसतंय. आतापर्यंत शिंदेंनी ठाकरेंना अनेक हादरे दिले आहेत, पक्ष असो, पक्षचिन्ह असो किंवा मग आता पक्षप्रमुख पद, सगळं काही शिंदेंना मिळालं आहे. त्यामुळे आता ठाकरे शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या कल्याणमध्ये त्यांच्याच मुलाला हादरा देण्यात यशस्वी ठरणार का? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

advertisement

'माझ्या वजनाने बाबरीच काय, पण...', फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Loksabha Elections 2024 : ठाकरेंच्या कल्याण दौऱ्याचे पडसाद, श्रीकांत शिंदेंचं उद्धव-आदित्यना थेट चॅलेंज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल