'सातारा जिल्ह्याचा तुतारीचा उमेदवार हा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुतारीमध्ये घोटाळा करतो, हे खूप लांच्छनास्पद आहे. खूप वाईट वाटतं, अशा व्यक्तीला उमेदवारी मिळते, तर मग आम्ही पवार साहेबांना काही बोलूच शकत नाही', असा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला आहे.
खरंतर तर नरेंद्र पाटीलांनी ज्या आधारे शिंदेंवर आरोप केला, त्याला कोरेगावच्या शिवसेना आमदार महेश शिंदेंचा संदर्भ आहे. '5 लाख रुपयाला एक हजार स्क्वेअर फूटचा गाळा जो वाशी मार्केटला विकला आहे, हे मी नाही हायकोर्ट म्हणत आहे. म्हणून हायकोर्टाने यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून घेऊन हे सगळे गाळे परत घेण्याचे आणि कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत', असं महेश शिंदे म्हणाले आहेत.
advertisement
विरोधकांच्या या आरोपांना शशिकांत शिंदेंनीही प्रत्युत्तर दिलंय.. विरोधकांकडून रडीचा डाव खेळला जात असल्याचा पलटवार शशिकांत शिदेंनी केला. ऐन लोकसभा निवडणुकीत माथाडी नेत्यांनीच शशिकांत शिंदेंची कोंडी करण्याची खेळी केली आहे, त्यामुळे साताऱ्याच्या निवडणुकीवरुन सध्या वाशी एपीएमसीतील वातावरण तापल्याचं दिसतंय. जसजसा प्रचाराचा वेग येईल, तसं सातारा आणि वाशी एपीएमसीतील वातावरणही तापण्याची शक्यता आहे.
