'मोदींच्या समोर जे गठबंधन झालं आहे ते कोण आहेत? इंडिया आघाडी फक्त मुलामुलींसाठी आहे. सोनिया गांधींना राहुल गांधींना पंतप्रधान बनवायचं आहे, उद्धव ठाकरेंना आदित्यला तर शरद पवारांना मुलीला मुख्यमंत्री बनवायचं आहे. ममता दिदींना भाच्याला तर स्टालिनला मुलाला मुख्यमंत्री बनवायचं आहे. यामध्ये तुमच्यासाठी कुणी आहे का? पण तुमच्यासाठी नरेंद्र मोदी आहेत', असं म्हणत अमित शाह यांनी इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला.
advertisement
शरद पवारांवर थेट हल्ला
'शरद पवारांना 50 वर्ष जनता सहन करतेय, पवारांनी फक्त 5 वर्षांचा हिशोब द्यावा. महाराष्ट्राची जनता 5 दशकं पवारांचं ओझं वाहत आहे', असं म्हणत अमित शाह यांनी शरद पवारांवर थेट हल्ला केला.
'महाविकासआघाडीच्या तीनचाकी ऑटोचे तीनही चाकं पंक्चर. महाराष्ट्राला पंक्चरवाली ऑटो विकास देऊ शकते का? एकनाथ जी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात भाजपच महाराष्ट्राला विकास देऊ शकते', असं म्हणत अमित शाहांनी महाविकासआघाडीलाही टोला लगावला.
