TRENDING:

चेअरमन असल्याचं भासवलं, १ कोटी १० लाख ट्रान्सफर करायला लावले, पवारांचे आमदार अभिजित पाटलांच्या कारखान्यात काय घडलं?

Last Updated:

MLA Abhijeet Patil: धाराशिवमधील आमदार अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यात १ कोटी १० लाखांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
धाराशिव : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माढा येथील आमदार अभिजित पाटील यांच्या साखर कारखान्यात 1 कोटी 10 लाखांची ऑनलाईन फसवणूक झाल्याच धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अभिजीत पाटील (आमदार)
अभिजीत पाटील (आमदार)
advertisement

धाराशिवमधील साखर कारखान्यात ही ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. धाराशिव कारखान्याचे चेअरमन असल्याचे भासवत 1 कोटी 10 लाखांची ऑनलाइन फसवणूक झाली असून चोराखळी येथील कारखान्याचे एमडी तसेच अभिजीत पाटलाचे बंधू अमर पाटील असल्याचे भासवले.

तसेच अमर पाटील यांचा फोटो डीपीला ठेवत धाराशिव कारखान्याचे बाबासाहेब कचरु वाडेकर यांना फोनवर आणि व्हाट्सअपवर बोलत कारखान्याच्या अकाउंटवरून एक कोटी दहा लाख रुपये ट्रान्सफर करायला लावले.

advertisement

बाबासाहेब वाडेकर यांनी ते पैसे कारखान्यातूनच आरटीजीएस केले पण दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने अमर पाटील यांना याबाबत कल्पना दिली. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. वाडेकर यांच्या तक्रारीवरून धाराशिव सायबर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोण आहे आमदार अभिजीत पाटील?

अभिजीत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार आहेत

advertisement

२०२४ विधानसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत

सारख उद्योगाशी त्यांचा चजवळचा संबंध आहे

बंद पडलेले साखर कारखाने त्यांनी विकत घेऊन ते यशस्वीपणे सुरू केले

लोकसभा निवडणूक काळात त्यांच्यावर आयकर विभागाच्या धाडीही पडल्या होत्या

त्यामुळे ते चर्चेत आले होते, परंतु विधानसभा काळात त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून निवडणूक लढवली

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चेअरमन असल्याचं भासवलं, १ कोटी १० लाख ट्रान्सफर करायला लावले, पवारांचे आमदार अभिजित पाटलांच्या कारखान्यात काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल