मतदान केंद्रावर जाताना काय कराल?
तुमचे नाव यादीत असेल, तर तुमच्या घरी आलेल्या किंवा तुम्ही ऑनलाइन डाऊनलोड केलेल्या निवडणूक स्लिपची (Voter Slip) प्रिंट घेऊन केंद्रावर जा. या स्लिपसोबत ओळख पटवण्यासाठी खालीलपैकी कोणतेही एक अधिकृत कागदपत्र तुम्ही सोबत नेऊ शकता:
१. आधार कार्ड २. पॅन कार्ड ३. ड्रायव्हिंग लायसन्स ४. बँक किंवा पोस्ट ऑफिसचे फोटो असलेले पासबुक ५. पासपोर्ट (पारपत्र) ६. मनरेगा जॉब कार्ड ७. आरोग्य विमा स्मार्ट कार्ड ८. पेन्शन कार्ड (फोटोसह) ९. केंद्र किंवा राज्य सरकारचे अधिकृत ओळखपत्र १०. दिव्यांग ओळखपत्र ११. खासदार किंवा आमदारांनी दिलेले अधिकृत ओळखपत्र १२. राष्ट्रीय लोकसंख्या कार्ड
advertisement
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, तुमच्याकडे अधिकृत मतदार ओळखपत्र नसेल तरीही तुम्ही मतदान करू शकता. यासाठी सर्वात महत्त्वाची अट एकच आहे, ती म्हणजे तुमचे नाव अधिकृत मतदार यादीत असणे आवश्यक आहे. जर तुमचं नावच मतदार यादीमध्ये नसेल तर तुम्हाला मतदानाचा हक्क बजावता येणार नाही.
नका ठेवू कोणतीही शंका!
अनेकदा जुन्या ओळखपत्रावरील फोटो अस्पष्ट असतो किंवा नाव बदललेले असते, अशा वेळी वरीलपैकी आधार किंवा पॅन कार्ड तुमच्यासाठी सर्वात सोपा पर्याय ठरू शकतो. दिव्यांग मतदारांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्रावर विशेष रांगा आणि सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
