TRENDING:
LIVE NOW

Mahanagar Palika Election 2026 Live: काँग्रेस उमेदवाराचं कार्यालय जाळलं, नागपुरात भाजप कार्यकर्त्यांवर आरोप

Last Updated:

Municipal corporation election Live Updates: कुठे EVM मशीन बंद तर कुठे मतदार यादीमध्ये नावच नाही, अजब घोळ अन् मतदारांचा संताप, राज्यातील निवडणुकीचे सगळे अपडेट्स वाचा एका क्लिकवर.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकींसाठी आज मतदान सुरू झालं आहे. मतदान केंद्रांबाहेर सकाळी 6.30 वाजल्यापासून नागरिकांच्या रांगा आहेत. अमरावतीमध्ये EVM मशीनमध्ये बिघाड झाला आहे. सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. पालिका निवडणुकीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. राज्यातील 27 महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर होणार, तर निकालानंतर भाजपच सर्वात मोठा पक्ष असेल. मुख्यमंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. या महानगरपालिका निवडणुकीचे संपूर्ण अपडेट्स वाचा एका क्लिकवर
News18
News18
advertisement
Jan 15, 202610:03 AM IST

ईव्हीएम दुरुस्त करणारे टीम आम्ही तैनात केली

काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडले त्यामुळे गोंधळ झाला पण ईव्हीएम दुरुस्त करणारे टीम आम्ही तैनात केली आहे
काही समाजकंटक मुद्दामहून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात त्यांची गय केली जाणार नाही
ड्रोन पेट्रोलिंग द्वारे देखील संपूर्ण शहरावर आमचे लक्ष असणार आहे
जिथे काही अडचणी आल्यात त्या ठिकाणी तांत्रिक बिघड टीम पाठवण्यात आली आहे
निवडणूक अधिकारी मनपा आयुक्त जी श्रीकांत यांची माहिती
Jan 15, 202610:02 AM IST

एका बोगस मतदाराने दुर्गादास शेट्टीच या आधीच मतदान केल्याने चर्चा

दुर्गादास शेट्टी या मतदाराने आपल्या मतदान करण्याकरता मतदान केंद्रावर आले असता त्यांच्या लक्षात आले की माझं मतदान यादीत झाला आहे… यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर दुर्गादास शेट्टी यांना बॅलेट नुसार मतदान करावे लागले एका बोगस मतदाराने दुर्गादास शेट्टीच या आधीच मतदान केल्याने चर्चा
Jan 15, 202610:02 AM IST

शिवसेनेचा उमेदवार कंत्राटदाराच्या घरात घुसला अन्.., नाशिकमध्ये घडला धक्कादायक प्रकार

महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या अगदी पूर्वसंध्येला शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रचार थांबल्यानंतरही विविध भागांतून आरोप-प्रत्यारोप, वादविवाद आणि तणावपूर्ण घटना समोर आल्या. काही ठिकाणी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये थेट संघर्ष झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या असून, यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात अस्थिरता निर्माण झाली आहे.
advertisement
Jan 15, 20269:44 AM IST

पुणे: प्रभाग क्रमांक २६ मध्ये ६ मतदान केंद्रातील यंत्र बंद पडले

प्रभाग क्रमांक २६ मध्ये ६ मतदान केंद्रातील यंत्र बंद पडले. तासाभराच्या प्रयत्नानंतर मशीन सुरू, काही ठिकाणी यंत्र बदलले.
– स्वारगेट पोलिस लाईन,
– सेंट हिल्डाज स्कूल मधील दोन केंद्र
– सावित्रीबाई फुले स्मारक
– घोरपडे पेठ उद्यान वसंतदादा अभ्यासिका
– महात्मा गांधी उर्दू शाळा
Jan 15, 20269:33 AM IST

संभाजीनगर: मतदान केंद्रावरील EVM बंद पडल्याने उमेदवार आक्रमक

ज्ञानेश्वर विद्यालय बेगमपुरा येथील मतदान केंद्रावरील EVM बंद पडल्याने उमेदवार आक्रमक. अधिकारी आणि उमदेवार प्रतिनिधी यांच्यात शाब्दिक बाचाबाची.. अर्धा तासापेक्षा जास्त वेळ बंद पडल्याने उमेदवार प्रतिनिधी आक्रमक झाले.
Jan 15, 20269:32 AM IST

नाशिक महापालिका निवडणुकीत माजी खासदार हेमंत गोडसे यांनी केलं मतदान

– नाशिक महापालिका निवडणुकीत शिंदे यांची शिवसेना विरुद्ध भाजपा असा आहे सामना
– शिंदेंच्या शिवसेनेच नाशिक मध्ये नेतृत्व करणारे हेमंत गोडसे यांचीही नाशिकमध्ये आहे प्रतिष्ठा पनाला
– मंत्री गिरीश महाजन आणि माजी खासदार हेमंत गोडसे यांची नाशिक महापालिका निवडणुकीत आहे प्रतिष्ठा पणाला
advertisement
Jan 15, 20269:29 AM IST

खासदार कन्येची प्रतिष्ठेची पणाला, ईशान्य मुंबईत बजावला मतदानाचा हक्क

प्रभाग क्रमांक 114 च्या उमेदवार राजुल संजय पाटील तसेच ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे यांनी कार्यालयाजवळील शाळेत, भांडुप (पश्चिम) स्टेशन रोड, गीता हॉल या ठिकाणी केले मतदान..
Jan 15, 20269:27 AM IST

बिनविरोध निवड झालेल्या उमेदवार दीपमाला काळे यांनी मतदान केंद्रावर झालेली चूक प्रशासनाच्या आणली लक्षात

जळगावमध्ये मतदान केंद्र क्रमांक 7 वर खोल्यांवर नंबरच नसल्याने मतदारांचा गोंधळ उडत असून बिनविरोध निवड झालेल्या उमेदवार दीपमाला काळे या मतदान केंद्रावर मतदानासाठी आले असता सदर प्रकार दीपमाला काळे यांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिला आहे. मात्र त्यापूर्वी खोल्या मिळत नसल्याने काही मतदारांचा गोंधळाला असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी बिनविरोध उमेदवार दीपमाला काळे यांनी केली आहे.
Jan 15, 20269:26 AM IST

छत्रपती संभाजीनगर: EVM बंद पडल्यामुळे गुजराती कन्या विद्यालयामध्ये गोंधळ

गुजराती कन्या विद्यालयामध्ये गोंधळ मशीन बंद पडल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ तब्बल एक तास ईव्हीएम मशीन बंद असल्याने नागरिकांचा गोंधळ मशीनमध्ये बिघाड झाला आणि त्यानंतर मशीन दुरुस्त करण्यास जवळपास एक तास विलंब झाला नागरिकांना जवळपास एक तास ताटकळत उभे राहावे लागले मतदान केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांनी…
advertisement
Jan 15, 20269:25 AM IST

पनवेल: भाजप आणि मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार भांडण

पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19 मध्ये मतदान केंद्रावर गोंधळ
भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार भांडण
दुबार मतदार असल्याचं म्हणत मतदाराला लॉकअप मध्ये टाका असं म्हणणाऱ्या व्यक्तीवर भाजपचे कार्यकर्ते चिडले
प्रभाग क्रमांक 19 मधील गुजराती शाळा मधील मतदान केंद्रावर संपूर्ण गोंधळ
पोलिसांकडून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना समज देण्याचा प्रयत्न
Jan 15, 20269:20 AM IST

नागपूर: काँग्रेसचे कार्यालय जाळले, भाजप कार्यकर्त्यांवर आरोप

– काँग्रेसचे कार्यालय जाळले, भाजप कार्यकर्त्यांवर आरोप
– प्रभाग 31 मधील काँग्रेस उमेदवार शिवानी चौधरी यांचे कार्यालय जाळण्यात आले
Jan 15, 20268:45 AM IST

Mahanagar Palika Election 2026 Live: आठ महिन्याचं बाळ घेऊन आई-वडील मतदान केंद्रावर

चेंबूरमधील टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्स या मतदान केंद्रावर एक दाम्पत्य आपल्या आठ महिन्यांच्या बाळाला घेऊन मतदानासाठी उपस्थित होतं. मोठ्या उत्साहात ते मतदान करण्यासाठी आले आणि मतदान आमची जबाबदारी आल्याचं त्यांनी म्हटलं. संवाद साधलाय.. प्रतिनिधी संकेत वरक याने
advertisement
Jan 15, 20268:45 AM IST

डोळ्याला टीका आणि पुष्पवृष्टी करुन मतदारांचं स्वागत, नागपुरात अनोखा प्रयोग

– नागपूरच्या अभ्यंकर नगर मधील नूतन भारत विद्यालयाचा मतदान वाढीसाठी विद्यार्थ्यांच्या मनात लोकशाही मजबूत होण्यासाठी अनोखा प्रयोग
– मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांचे पारंपरिक पद्धतीने टीका लावून पुष्पवृष्टी करून केलं जातं आहे स्वागत
– मतदान केंद्र आकर्षक सजवले असून शाळेचे मूल करत आहे, विद्यार्थ्यांचे स्वागत
– मतदान केंद्रावर आलेले मतदार स्वागत बघून भारावून जात आहे
Jan 15, 20268:43 AM IST

कुर्ला पूर्व येथील कामगार नगरच्या पंत वालालवकर शाळेतील मतदान केंद्रावर गोधळ

मतदारांची नावे, केंद्र, बूथ बदलल्याने गोंधळ वाढला नावे, बूथ शोधण्यासाठी निवडणूक कर्मचारी सहकार्य करत नसल्याचा मतदारांचा आरोप
Jan 15, 20268:39 AM IST

दुबार मतदारांचा घोळ घालून ठेवलाय- किशोरी पेडणेकर

दुबार मतदारांचा घोळ आधीच घालुन ठेवला आहे. पाडु नावाचं मशिन आणलं. मुंबईकर प्रतिकुल पारिस्थितीत मतदान करत आहेत, किशोरी पेडणेकर यांनी भाजप आणि युतीवर टीका केली आहे.
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mahanagar Palika Election 2026 Live: काँग्रेस उमेदवाराचं कार्यालय जाळलं, नागपुरात भाजप कार्यकर्त्यांवर आरोप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल