TRENDING:

IAS Transferred: राज्यातील ४ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, CM फडणवीस यांचा मोठा निर्णय

Last Updated:

Maharashtra IAS Transferred: राज्यातील ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य शासनाकडून करण्यात आल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तुषार रुपनवर, प्रतिनिधी, मुंबई : महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात वेगाने खांदेपालट होत आहेत. सोमवारी राज्यातील ४ ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशाने चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश
सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश
advertisement

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हातात घेतल्यापासून गेल्या वर्षभरात बदल्यांचा धडाका सुरू आहे. प्रत्येक १०-१५ दिवसाला ८-१० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. बदल्यांच्या धडाक्याची परंपरा या आठवड्यात देखील अबाधित आहे.

कोणकोणत्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या?

१) श्रीधर दुबे (IAS:SCS:२०१४) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ, मुंबई यांची आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

advertisement

२) सत्यजित बडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड यांची अपंग व्यक्तींसाठी आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

३) डॉ. सुनील भोकरे निवड (Non-SCS), DOPT, अधिसूचना २८.०१.२०२६ रोजी नियुक्ती महाराष्ट्र एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई यांचे प्रकल्प संचालक, शहरी आरोग्य, मुंबई येथे आयुक्त, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

advertisement

४) श्री राहुल कुलकर्णी निवड (Non-SCS), DOPT, अधिसूचना दिनांक २८.०१.२०२६ सहसचिव, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांना महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

चार दिवसांपूर्वीच दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात घट, सोयाबीन आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

ज्येष्ठ सनदी अधिकारी मनिषा म्हैसकर पाटणकर आणि मिलिंद म्हैसकर यांच्या बदल्यांचे निर्णय शुक्रवारी सायंकाळी जारी करण्यात आले होते. मनिषा म्हैसकर पाटणकर यांची बदली अपर मुख्य सचिव (गृह), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर डॉ. आय. एस. चहल, भाप्रसे यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त होत असलेल्या जागी केली आहे. मनिषा म्हैसकर पाटणकर यांच्या जागी मिलिंद म्हैसकर, भाप्रसे यांची नियुक्ती केली आहे

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
IAS Transferred: राज्यातील ४ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, CM फडणवीस यांचा मोठा निर्णय
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल