या सिरफमध्ये काही विषारी घटक असल्याचं समोर आले आहे. कोल्ड्रीफ सिरप हे औषध मे. स्रेसन फार्मा तामिळनाडूमधील कांचीपुरममधील या कंपनीत तयार झाल्याची माहीती आहे. कोल्ड्रीफ सिरपमध्ये डायइथिलीयन ग्लायकोल हा विषारी पदार्थ आढळल्यानं इतर राज्यात बालकांचा मृत्यू झाला. म्हणून कोल्ड्रिफ सिरपचा वापर तत्काळ थांबवा, असे निर्देश अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील एफडीएनेही अशा घटना होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना स्थानिक यंत्रणांना दिल्या आहेत.
advertisement
प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन
औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त अंजली मिटकर म्हणाल्या, स्टोकिस्टला संबंधित औषधी असेल तर त्या विक्री न करण्याचा सूचना केल्या आहेत. सॅम्पलिंग करण्याला सुरुवात केली आहे. 20 पेक्षा जास्त सॅम्पल जमा केले असून त्याच्या पुढील तपासणीसाठी सॅम्पल शासकीय प्रयोगशाळेत पाठविले आहे. कोल्डरिफ निर्माण करणाऱ्या कंपनीचे इतर प्रोडक्ट तपासले जात आहे. काही संशयास्पद वाटलं तर प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
कफ सिरपमुळे मुलांच्या किडनीवर परिणाम
कफ सिरपमुळे आजारी असलेल्या मध्य प्रदेशातील 16 ते 18 मुलांवर नागपुरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. यापैकी 3 व्हेंटिलेटरवर तर 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील ही मुलं आहेत. यापूर्वी 6 मुलांचा मृत्यू नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयात झाला आहे तर नागपूरमध्ये एकूण मृत्यू संख्या 9 वर आहे. 'कोल्डरीफ' या कफ सिरपमुळे मुलांच्या किडनीवर परिणाम होऊन किडनी निकामी झाल्याने मुलाचा मृत्यू होत आहे . तसेच मुलांच्या मेंदूवरही सूज येत आहे. शासकीय मेडिकल रुग्णालयासह काही मुलांवर विविध खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत