येत्या १५ मेपर्यंत दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर होतील, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा दरवर्षीपेक्षा यंदा दहा दिवस लवकर सुरू झाल्या होत्या. विद्यार्थ्यांना पुढील करिअरच्या दृष्टीने नियोजनासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून परीक्षेसोबतच निकालदेखील लवकर जाहीर केला जाणार आहे.
बारावीच्या लेखी परीक्षेला ११ फेब्रुवारीपासून तर, दहावीच्या लेखी परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली होती. सध्या सर्व विभागीय मंडळाच्या निकालाचा एकत्रित आढावा घेण्याचे काम सुरू आहे. साधारणपणे ५ मे ते १० मेदरम्यान बारावीचा निकाल जाहीर होईल. तर, १५ मेपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.
advertisement
विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं होणार?
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात एकूण ३५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना गुणांसह ग्रेड देखील मिळतील. ग्रेडिंग सिस्टीमनुसार, ७५ टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना डिस्टिंक्शन मिळणार आहे. ६० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना प्रथम श्रेणी मिळेल. ४५ टक्के ते ५९ टक्के गुण मिळवणाऱ्यांना द्वितीय श्रेणी मिळेल. उत्तीर्ण होण्यासाठी ३५ पेक्षा जास्त गुण हवे. ज्या विद्यार्थ्यांना हे किमान गुणही मिळू शकणार नाहीत त्यांना पुन्हा पुरवणी परीक्षेला बसावे लागेल.
कुठे पाहता येणार निकाल
mahahsscboard.in
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscboardpune.in
sscresult.mkcl.org
hsc.mahresults.org.in
निकाल कसा चेक कराल?
-सगळ्यात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जा.
-होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्याला क्लिक करा.
-क्लिक करताच नवीन विंडो ओपन होईल. त्याठिकाणी सीट नंबर आणि इतर माहिती भरुन ‘सबमिट’ बटनवर क्लिक करा.
-त्यानंतर तुमचा बोर्डाचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
-हा निकाल डाऊनलोड करता येईल.