>> मराठवाड्यासाठी योजना कोणत्या?
> कोकणातील नद्यांचे पाणी मराठवाड्यासाठी वळविणार
> कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून 54.70 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा आज अर्थसंकल्पीय भाषणात करण्यात आली.
> मराठवाड्यातील सिंचन क्षमतेत वाढणाऱ्या प्रकल्पामुळे सुमारे 2 लाख 40 हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
advertisement
> प्रकल्पाचे सर्वेक्षण व अन्वेषण सुरू – तांत्रिक बाबींचा अभ्यास करून लवकरच प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात होण्याची शक्यता.
> कोकणातील जलसंपत्तीचा प्रभावी उपयोग – अतिरिक्त पाणी वाया न जाता कोरडवाहू भागासाठी वापरण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न.
> मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांना दिलासा – सिंचन सुविधांमुळे शेती उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
> या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मराठवाड्याच्या पाणीटंचाईचा मोठ्या प्रमाणात निचरा होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
> गोदावरी खोरे पुनर्भरण व मराठवाडा ग्रीड हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणार आहेत. या प्रकल्पाची एकूण किंमत 37 हजार 668 कोटी रुपये आहे.
> दमणगंगा -एकदरे -गोदावरी या नदीजोड प्रकल्पामुळे 3.55 टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून त्यामुळे जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील 9 हजार 766 हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होईल. नाशिक जिल्ह्यातील 2 हजार 987 हेक्टर क्षेत्रालाही यामुळे सिंचनाचा लाभ होईल. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 2 हजार 300 कोटी रूपये आहे.
> वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पास तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 88 हजार ५७4 कोटी रुपये असून प्रकल्पाचे लाभक्षेत्र 3 लाख 71 हजार 277 हेक्टर आहे. या प्रकल्पाचा लाभ नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला व बुलढाणा या सहा जिल्हयांना होणार आहे. प्रकल्पाची सविस्तर सर्वेक्षण व अन्वेषणाची कामे सुरू आहेत.
