TRENDING:

Maharashtra Budget 2025 : महायुतीचं मिशन महापालिका, मुंबई-पुणे अन् ठाण्याकरता अजितदादांच्या 7 मोठ्या घोषणा

Last Updated:

महाराष्ट्र सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केलं आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतरचं महायुती सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : महाराष्ट्र सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केलं आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतरचं महायुती सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे, त्यामुळे या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना काय दिलासा मिळणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अर्थमंत्री अजित पवार यांनी या अर्थसंकल्पातून शेतकरी, ग्रामीण भागासह शहरी भागांसाठीही मोठ्या घोषणा केल्या आहेत.
महायुतीचं मिशन महापालिका, मुंबई-पुणे अन् ठाण्याकरता अजितदादांच्या 7 मोठ्या घोषणा
महायुतीचं मिशन महापालिका, मुंबई-पुणे अन् ठाण्याकरता अजितदादांच्या 7 मोठ्या घोषणा
advertisement

महाराष्ट्रातल्या महानगरांमधील महामेट्रो विकास प्रकल्पासाठी सरकार कोट्यवधींचा निधी देणार आहेत, याचा फायदा मुंबई, नागपूर आणि पुण्यासारख्या महानगरांना होणार आहे.

1) मुंबई, नागपूर व पुणे महानगरांतील नागरिकांना पर्यावरणपूरक, शाश्वत, विनाअडथळा व वातानुकुलित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकूण 143.57 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत. या सेवेचा लाभ सुमारे 10 लाख प्रवासी रोज घेत आहेत.

advertisement

2) येत्या वर्षात मुंबईमध्ये 41.2 किलोमीटर, तर पुण्यामध्ये 23.2 किलोमीटर असे एकूण 64.4 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत.

3) येत्या 5 वर्षांत एकूण 237.5 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

4) नागपूर मेट्रोचा 40 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यात 6 हजार 708 कोटी रुपये किंमतीचे 43.80 किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर आहे.

advertisement

5) ठाणे वर्तुळाकार मेट्रो मार्ग तसेच पुण्यातील स्वारगेट ते कात्रज विस्तार मार्गिका प्रकल्पास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे.

6) पुणे मेट्रो रेल्वे टप्पा-2 अंतर्गत खडकवासला - स्वारगेट - हडपसर - खराडी आणि नळ स्टॉप - वारजे - माणिकबाग या दोन मार्गिकांचा 9 हजार 897 कोटी रुपये किंमतीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठविला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

7) मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Budget 2025 : महायुतीचं मिशन महापालिका, मुंबई-पुणे अन् ठाण्याकरता अजितदादांच्या 7 मोठ्या घोषणा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल