TRENDING:

Maharashtra Budget For Mumbai MMR: CM फडणवीसांनी मुंबईसाठी तिजोरी उघडली, मेट्रो, जल वाहतूक ते भुयारी मार्ग, एमएमआरसाठी घोषणांचा पाऊस

Last Updated:

Maharashtra Budget 2026: मेट्रो मार्ग ते जलमार्ग, भुयारी रस्ते मार्ग अशा विविध योजना मुंबई महानगरसाठी करण्यात आली आहे. मुंबई महानगर भागातील अर्थव्यवस्था ही ३०० अब्ज डॉलरवर नेणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री-अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. दिवंगत उपमुख्यमंत्री आणि अर्थ मंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. मुंबई महानगर क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा आजच्या अर्थसंकल्पीय भाषणात करण्यात आली. मेट्रो मार्ग ते जलमार्ग, भुयारी रस्ते मार्ग अशा विविध योजना मुंबई महानगरसाठी करण्यात आली आहे. मुंबई महानगर भागातील अर्थव्यवस्था ही ३०० अब्ज डॉलरवर नेणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री-अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
CM फडणवीसांनी मुंबईसाठी तिजोरी उघडली, मेट्रो, जल वाहतूक ते भुयारी मार्ग, एमएमआरसाठी घोषणांचा पाऊस
CM फडणवीसांनी मुंबईसाठी तिजोरी उघडली, मेट्रो, जल वाहतूक ते भुयारी मार्ग, एमएमआरसाठी घोषणांचा पाऊस
advertisement

मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे फडणवीस यांनी अर्थ खात्याची जबाबदारी स्वतःकडे घेतली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला म्हटले की, आज माझं जड झालंय आहे. आजचा अर्थसंकल्प आपण अजितदादांना समर्पित करत असल्याचे त्यांनी म्हटले.

>> मुंबई महानगर क्षेत्रासाठी कोणत्या मोठ्या घोषणा?

advertisement

मुख्यमंत्री-अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई, ठाणे आणि जवळपासच्या परिसरातील पायाभूत सुविधा, मेट्रो संबंधित घोषणा केल्या.

> दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गासोबत जोडण्यासाठी २०२८ पर्यंत काम करण्याचे प्रयत्न

> राज्यात १ हजार २०० किमीचे मेट्रो मार्ग व ६ हजार किमीचे द्रुतगती मार्ग विकसित केले जातील

> २०२९ पर्यंत १६५ किमी मार्गाचे मेट्रो मार्गिका तयार केल्या जातील

advertisement

> दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गासोबत जोडण्यासाठी २०२८ पर्यंत काम करण्याचे प्रयत्न आहेत

> वर्सोवा-भाईंदर किनारी मार्ग डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे

> पनवेल ते कर्जत अंतिम टप्प्यात, लवकरच वाहतुकीसाठी खुला करणार आहे.

> वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया मुंबई मेट्रो मार्गिका 11 हा 23487 कोटी रुपये किंमतीचा पूर्णपणे भूमिगत प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

advertisement

> या प्रकल्पाचा विस्तार धारावी पुनर्वसन प्रकल्पासून वांद्रे टर्मिनर्सपर्यंत करण्याचे नियोजन.

> मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडणारा मुंबई मेट्रो मार्ग क्रमांक 8 हा 22862 कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे

> तळोजा ते खांदेश्वर मेट्रो मार्ग 2 मुळे नवी मुंबई विमानतळापर्यंत वाहतूक व्यवस्था सुधारले

> वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी भुयारी मार्गांचे जाळे विणण्याची योजना

advertisement

> मुंबईतील पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणाऱ्या गोरेगाव-मुलुंड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात

> मुंबई महानगरात जलमार्गाचे ३४० किलोमीटर पर्यंत वाढवणार, १ कोटी ६० लाख पर्यंत असलेली प्रवासी संख्या ७ कोटीपर्यंत वाढेल

> विरार बोईसर आणि ठाणे बुलेट ट्रेन स्थानकाच्या विकाकासाठी विशेष प्रयत्न

> वाढवणजवळ चौथी मुंबई विकसित कऱण्यासाठी प्रयत्न

> मुंबई आणि नवी मुंबई विमानतळांना जोडणारा विशेष मेट्रो मार्ग हाती घेतला जाणार

> चौथी मुंबई वाढवण येथे होईल

> एमएमआरमध्ये १० लाख नवी घरे उभारणार

> नवी अनधिकृत बांधकामे होणार नाहीच याचा रोडमॅप तयार होणार

> बुलेट ट्रेन तीन स्थानकाच 2027 पर्यंत पुर्ण हेईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

> राज्यात शहरी विकास ७० टक्के लोकसंख्या होणार आहे. त्यामुळे शहरी सेवा डिजीटल करणार आहे

> बुलेट ट्रेनच्या तलासरीपर्यंतच्या तीन स्थानकाचं काम २०२७ पर्यंत पूर्ण होईल

> ⁠तिसरी मुंबई म्हणून उरण या परिसरात विकास होतील

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
व्यवसायाला विदेशी बाजारपेठेचं स्वरूप,बनवतात लाकडी वस्तू, 2 लाखांची उलाढाल
सर्व पहा

> ⁠मुंबईत बेकायदेशीर बांधकाम होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Budget For Mumbai MMR: CM फडणवीसांनी मुंबईसाठी तिजोरी उघडली, मेट्रो, जल वाहतूक ते भुयारी मार्ग, एमएमआरसाठी घोषणांचा पाऊस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल