"एक जिल्हा - एक उत्पादन" उपक्रमांतर्गत जिल्ह्यांचा विकास
राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची विशिष्ट उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ओळख निर्माण करण्यासाठी "एक जिल्हा - एक उत्पादन" (One District-One Product) उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील पारंपरिक व वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना प्रोत्साहन दिले जाणार आहे, ज्यामुळे त्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळेल आणि स्थानिक उद्योगांना मोठा फायदा होईल.
advertisement
राज्य-जिल्हा निर्यात प्रोत्साहन परिषद
निर्यात क्षेत्राला बळकटी देण्यासाठी राज्यात "राज्य-जिल्हा निर्यात प्रोत्साहन परिषदा" स्थापन करण्यात येत आहेत. या परिषदांमार्फत निर्यातदारांना सहकार्य, धोरणात्मक मदत आणि वित्तीय सहाय्य दिले जाणार आहे. तसेच निर्यात प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर दिला जात आहे.
निर्यात वाढीचे आकडे
सन 2023-24 मध्ये राज्याने 5,56,379 कोटी रुपयांची निर्यात केली. सन 2024-25 मध्ये नोव्हेंबर 2024 पर्यंतच 3,58,439 कोटी रुपयांची निर्यात पार पडली आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत वेगाने वाढत आहे.
महाराष्ट्राचा निर्यात क्षेत्रातील पुढाकार
या धोरणांमुळे महाराष्ट्र लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांसाठी निर्यात केंद्र बनत आहे. तसेच, राज्यातील स्थानिक उत्पादकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळवण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जात आहे. महाराष्ट्र देशाच्या आर्थिक वाढीचा कणा म्हणून अधिक मजबूत होत असून, जागतिक बाजारपेठेतही आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे.
