TRENDING:

'पॉवर कपल'! एकाच पालिकेत पती-पत्नीकडे सत्तेच्या चाव्या; कुठं घडला अनोखा इतिहास!

Last Updated:

Parbhani News: राजकीय घराणेशाहीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज्यात अनोखी घटना घडली आहे. एकाच नगर पालिकेत एका दाम्पत्याच्या हाती सत्तेची सूत्रे आली आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
परभणी: राजकीय घराणेशाहीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज्यात अनोखी घटना घडली आहे. एकाच नगर पालिकेत एका दाम्पत्याच्या हाती सत्तेची सूत्रे आली आहेत. पत्नी नगराध्यक्ष असून तिच्या पाठोपाठ पतीदेखील उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. राज्यात आता या 'पॉवरफुल कपल'ची चर्चा सुरू झाली आहे.
'पॉवर कपल'! एकाच पालिकेत पती-पत्नीकडे सत्तेच्या चाव्या; कुठं घडला अनोखा इतिहास!
'पॉवर कपल'! एकाच पालिकेत पती-पत्नीकडे सत्तेच्या चाव्या; कुठं घडला अनोखा इतिहास!
advertisement

परभणी जिल्ह्यातील मानवत नगरपालिकेने आज राज्याच्या राजकारणात एका ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विक्रमाची नोंद केली आहे. नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी आधीच राणी लाड विराजमान असताना, आता त्यांचे पती डॉ. अंकुश लाड यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतिहासात पती आणि पत्नी एकाच वेळी शहराच्या प्रथम आणि द्वितीय नागरिक पदावर असण्याचे हे अत्यंत दुर्मिळ उदाहरण ठरले आहे.

advertisement

राष्ट्रवादीचा 'क्लीन स्वीप'

मानवत नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे १६ सदस्यांसह निर्विवाद वर्चस्व आहे. यामुळे डॉ. अंकुश लाड यांची निवड निश्चित मानली जात होती. मात्र, राष्ट्रवादीच्या या भक्कम ताकदीसमोर विरोधकांनी सपशेल माघार घेतल्याने ही निवड बिनविरोध पार पडली.

नगरपालिकेत सध्या शिंदे सेनेचे ४, उद्धव सेनेचा १ आणि भाजपचा १ सदस्य आहे, मात्र कुणीही उमेदवारी अर्ज न भरल्याने लाड यांचा मार्ग मोकळा झाला.

advertisement

राजकारण पुरे, आता विकासावर लक्ष...

निवडीनंतर जल्लोषात सहभागी होताना लाड दाम्पत्याने शहराच्या विकासाचा निर्धार व्यक्त केला. "निवडणूक होईपर्यंत राजकारण होते, आता ते संपले आहे. आमचे संपूर्ण लक्ष आता मानवत शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर आणि सर्वांगीण विकासावर असेल. सर्व सदस्यांना सोबत घेऊन आम्ही शहराचा कायापालट करू," अशी ग्वाही नगराध्यक्षा राणी लाड आणि नवनियुक्त उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांनी दिली. या निवडीमुळे लाड समर्थकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असून, संपूर्ण मानवत शहरात फटाक्यांच्या आतषबाजीत आणि गुलालाच्या उधळणीत जल्लोष साजरा करण्यात आला.

advertisement

एकाच घरातील चारजण नगरपालिकेत...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Toyota ची धाकड MPV, 23 किमी मायलेज अन् सेफ्टीमध्ये टँकसारखी दणकट, किंमत किती?
सर्व पहा

डॉ. अंकुश लाड यांच्या घरातील चार सदस्य निवडून आले. यामध्ये त्यांच्या पत्नी राणी लाड ह्या नगराध्यक्षपदी तर सदस्य पदी डॉ अंकुश लाड हे स्वतः निवडून आले. आता, ते उपनगराध्यक्ष झाले आहेत. त्यांच्या आई सुशीला लाड व त्यांच्या चुलत भाऊ किशोर लाड हे देखील विजयी झाले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'पॉवर कपल'! एकाच पालिकेत पती-पत्नीकडे सत्तेच्या चाव्या; कुठं घडला अनोखा इतिहास!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल