TRENDING:

Maharashtra New CM Live Updates : महायुतीच्या नेत्यांचा राज्यापालांकडे सत्ता स्थापनेचा दावा, आता उद्या शपथविधी पार पडणार

Last Updated:

Maharashtra New CM Live News Updates in Marathi: भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची आज बैठक पार पडत आहे. भाजपचे नवनिर्वाचित आमदार गटनेता निवडणार असून हाच गटनेता राज्याचा मुख्यमंत्री असणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
 मुंबई : राज्यात सरकारस्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांकडून आजच गट नेत्याची निवड करण्यात येणार आहे. महायुतीचे नेते आजच राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. आमदारांच्या बैठकीपूर्वी भाजपच्या प्रदेश कोअर समितीची बैठक पार पडत आहे.
Maharashtra New CM
Maharashtra New CM
advertisement

भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड करण्यासाठी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी मुंबईत दाखल झाले आहेत. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यासुद्धा रात्री उशीरा मुंबईत पोहोचल्या. आज सकाळी विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आमदारांची बैठक होणार आहे. भाजपचा गटनेता निवडल्यानंतर महायुतीची बैठक होईल. यात नेत्याची निवड केली जाईल. यानंतर महायुतीचे नेते राजभवनात जाऊन राज्यपालांसमोर सरकार स्थापनेचा दावा करतील.  वाचा, सगळ्या राजकीय घडामोडी एका क्लिकवर...

advertisement

> फडणवीस, शिंदे, अजित पवार राजभवनावर

देवेंद्र फडणवीस,अजित पवार आणि एकनाथ शिंदे राजभवनावर दाखल झाले आहेत. आता महायुतीचे नेते राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत.

>देवेंद्र फडणवीस,अजित पवार वर्षावर दाखल

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत.  वर्षा बंगल्यावर महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी हे दोन्ही नेते दाखल झाले आहेत. या बैठकीत खातेवाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

advertisement

> फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर फटाक्यांची आतिषबाजी

देवेंद्र फडणवीस यांची गटनेते पदी निवड झाल्यानंतर त्यांच्या धरमपेठ निवासस्थानाच्या बाहेर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे.त्याचसोबत ढोल ताशावर कार्यकर्त्यांनी जल्लोष देखील केला आहे.

> देवेंद्र फडणवीसांची गटनेतेपदी निवड

माजी मुख्यमंत्री विजय रूपानी सुरूवातीला गटनेता पदासाठी आणखी कुणाचा प्रस्ताव आहे का? अशी विचारणा आमदारांना केली.त्यानंतर आमदारांनी नाही म्हटल्यावर रूपानी यांनी देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड केल्याची घोषणा केली आहे.

advertisement

>  गटनेतेपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव

चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.

गोपीचंद पडळकर - धनगर

संजय सावकारे - SC

योगश सागर - गुजराती

संभाजी पाटील - मराठा

मेघना बोर्डीकर - महिला मराठा

सुधीर मुनगंटीवार - कुमटी

अशोक ऊईके - आदिवासी

आशिष शेलार - मराठा मुंबई

advertisement

पंकजा मुंडे- ओबीसी

या प्रस्तावानंतर वरील सर्व समाजाच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांना अनुमोदन केले.

> ''माफ करा, फडणवीसांच...'', बावनकुळे बोलताना कोअर कमिटीच्या बैठकीत काय घडलं?

सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे. आज आपल्या विधीमंडळ गटनेत्याची निवड आहे. या निवडीकरता गुजरात प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाबचे प्रभारी विजय रुपाणी निरीक्षक म्हणून आले आहेत.बैठकीत सहनिरीक्षक म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आल्या आहेत.

हा ऐतिहासिक दिवस आहे. माफ करा, मी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करायचं राहुन गेलं. ते खाली बसले असल्यानं नाव राहिलं,असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

>  देवेंद्र फडणवीस फेटा बांधून सभागृहात दाखल

देवेंद्र फडणवीस सर्वांपेक्षा वेगळा फेटा बांधून सभागृहात दाखल झाले आहेत. त्याच्यासोबत केंद्रीय पर्यवेक्षक निर्मला सितारामण, विजय रूपाणी आणि भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे सभागृहात दाखल झाले आहेत.

>  भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला सुरुवात

भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार मांडणार आहेत. त्याला आशिष शेलार, रवींद्र चव्हाण अनुमोदन देणार आहेत.

>  आमदारांच्या बैठकीत कोण मांडणार प्रस्ताव? 

भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक थोड्या वेळेत सुरू होणार आहे. गटनेता पदासंदर्भात चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार प्रस्ताव मांडणार आहेत.

> कोअर समितीच्या बैठकीची मोठी अपडेट, फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब

भाजपच्या प्रदेश कोअर समितीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. कोअर समितीचा हा प्रस्ताव आता नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे.

> भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत काय होणार?

भाजपाच्या कोअर कमिटी बैठकीला सुरूवात झाली आहे.या बैठकीत गटनेता निवडी संदर्भात प्रस्ताव मांडला जाईल आणि त्यानंतर थेट विधीमंडळ सेन्ट्रल हॉल मध्ये सर्व आमदारांसमोर कोअर कमिटी बैठकीत संमत झालेला प्रस्ताव मांडला जाईल.सर्व आमदारांच्या अनुमोदन मिळाल्या नंतर भाजपा गटनेता निवडला जाईल.

> भाजपच्या कोअर समितीची बैठक सुरू

भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीपूर्वी भाजपच्या कोअर समितीची बैठक सुरू.

>''किमान 6 महिने तरी मुख्यमंत्रीपद....'', शाहांसोबतच्या बैठकीत शिंदेंनी केली होती मागणी

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. त्यानंतर महायुतीत सत्ता वाटपाचा तिढा सुरू झाल्याचे चित्र दिसून आले. राज्यातील निकालानंतर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यापूर्वी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शाह यांची स्वतंत्रपणे भेट घेतली होती. या बैठकीची इनसाईड स्टोरी समोर आली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा..

> Maharashtra Govt Formation : महायुतीतील 'गृह' कलह संपला! शिंदे होणार उपमुख्यमंत्री, कोणत्या खात्यांवर झाली डील?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

मुंबई :  विधानसभा निवडणूक निकालात महायुतीला प्रचंड बहुमत मिळून देखील मागील 12 दिवसांपासून सत्ता वाटपाचा तिढा सुरू होता. अखेर मंगळवारी रात्री हा तिढा सुटला असल्याची चर्चा आहे. राज्याच्या नव्या मंत्रिमंडळात गृह खाते हे शिवसेनेकडे असावे अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली होती. त्यावर आता तोडगा निघाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra New CM Live Updates : महायुतीच्या नेत्यांचा राज्यापालांकडे सत्ता स्थापनेचा दावा, आता उद्या शपथविधी पार पडणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल